मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात झपाट्याने वाढत चालला आहे. मागील चोवीस तासांत महाराष्ट्रात 30 हजार 535 कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. या वर्षातील सर्वात जास्त रुग्ण काल दिवसभरात सापडले. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी आजपासून मुंबईतील बस, रेल्वे स्थानक आणि मॉल्समध्ये अँटिजन टेस्ट करण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात आतापर्यंत 53 हजार 399 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू
महाराष्ट्रात आतापर्यंत 24 लाख 79 हजार 682 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तीन दिवसांपूर्वी 25,833 सगळ्यात जास्त कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली होती. यापूर्वी
स्पटेंबर 2020 मध्ये 24,896 नव्या रुग्णांची नोंद झाली होती. तर 99 रुग्णांच्या मृत्यूनंतर मृतांची संख्या 53 हजार 399 झाली होती.
11 हजार 314 रुग्ण कोरोनाने बरे होऊन घरीगेले आहेत. 22 लाख 14 हजार 867 कोरोनाबाधित रुग्ण आतापर्यंत बरे झालेले आहेत.मुंबईत तीन हजार 799 कोरोनाबाधित नव्या
रुग्णांची नोंद झाली आहे. तर 10 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.
देशात 83 टक्के नवीन रुग्ण पाच राज्यातून
देशात मागील चोविस तासांत 43 हजार 846 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. ही या वर्षातील सर्वाधिक रुग्णांची संख्या आहे. देशातील नव्या रुग्णांपैकी 83.14 टक्के रुग्ण महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरातमधील आहेत.
महाराष्ट्र, तमिळनाडू, पंजाब, मध्यप्रदेश, दिल्ली, कर्नाटक, गुजरात, हरियाणात दिवसेंदिवस कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. दिल्लीत शनिवारी पहिल्यांदाच 800 पेक्षा अधिक
कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे.
लोकांना वाटतयं कोरोना संपलाय, हेच कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचं कारण आहे
तज्ज्ञांच्या मते, लोकांना वाटतयं कोरोना संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे ते कोरोना नियमांचं पालन करताना दिसून येत नाहीत. एम्सचे संचालक रणदीप गुलेरियांच्या मते, 'कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची अनेक कारणं आहेत. पण मुख्य कारण म्हणजे, लोकांना वाटतयं कोरोनासंपलेला आहे. लोकांनी आणखी काही दिवस नियमांचं पालन करायला हवं'.