विधानपरिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी अनिल परब यांची वर्णी
एबीपी माझा वेब टीम | 07 Apr 2017 02:24 PM (IST)
मुंबई : विधानपरिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी अनिल परब यांची निवड झाली आहे. सभापतींनी सभागृहात आज अनिल परब यांच्या नावाची घोषणा केली. विधानपरिषदेच्या शिवसेना गटनेतेपदी गेल्या काही काळापासून दिवाकर रावते होते. मात्र मंत्रिमंडळात असल्याने त्यांना शिवसेनेची भूमिका नीट मांडता येत नव्हती. तर दुसरीकडे नुकत्याच झालेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत अनिल परब यांनी मोलाची कामगिरी करत शिवसेनेला आपला गड राखण्यास मदत केली होती. शिवाय याआधी वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत अनिल परब यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्याचंच बक्षीस म्हणून अनिल परब यांना विधानपरिषदेत शिवसेनेच्या गटनेतेपदी वर्णी लागल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेच्या विधान परिषदेच्या गटनेतेपदी अनिल परब : सूत्र