Anil Parab Ed Enquiry LIVE Update : 8 तास चौकशीनंतर परिवहन मंत्री अनिल परब ईडी कार्यालयातून बाहेर
Anil Parab Ed Enquiry LIVE Update : मनी लॉन्ड्रिंगप्रकरणी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना आज ईडीनं चौकशीसाठी बोलावलं आहे. ईडीनं अनिल परब यांना पाठवलेलं हे दुसरं समन्स आहे.
एबीपी माझा वेब टीमLast Updated: 28 Sep 2021 07:49 PM

पार्श्वभूमी
Anil Parab Ed Enquiry LIVE Update : ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर आता शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब चौकशीसाठी हजर राहणार आहेत. माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी ही माहिती...More
Anil Parab Ed Enquiry LIVE Update : ईडीने बजावलेल्या दुसऱ्या समन्सनंतर आता शिवसेना नेते आणि राज्याचे मंत्री अनिल परब चौकशीसाठी हजर राहणार आहेत. माध्यमांशी बोलताना अनिल परब यांनी ही माहिती दिली. आपण कोणताही गैरव्यवहार केला नसल्यानं आज ईडीच्या चौकशीला सामोरं जात असल्याचं अनिल परब यांनी स्पष्ट केलं. अनिल परब म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आपल्या मुलींची शपथ घेऊन सांगत आहे की कोणत्याही गैरव्यवहारात आपला हात नाही. आपल्याला ईडीने का बोलावलं आहे याची माहिती नाही. या चौकशीदरम्यान जे प्रश्न विचारले जातील त्याची उत्तर आपण देणार आहोत. ईडीने अनिल परब यांना दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. नेमक्या कोणत्या कारणासाठी आपल्याला चौकशीला बोलावलं आहे हे आपल्याला माहिती नसून ईडीला या प्रकरणी आपण संपूर्ण सहकार्य करणार असल्याचं अनिल परब यांनी सांगितलं. बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी ईडीला दिलेल्या जबाबात अनिल परब मुंबई आणि ठाण्यातील पोलीस दलातील बदल्या करत होतं, असं सांगितल्याची माहिती मिळत आहे. याशिवाय मुंबई महापालिकेच्या कंत्राटदारांकडून 50 कोटी रुपये वसूल करण्यासाठी अनिल परब यांनी सांगितलं होतं, असा दावाही सचिन वाझे यांनी पत्र लिहून केला होता. महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लागला आहे. अनिल देशमुखांच्या नंतर शिवसेना नेते अनिल परब आणि खासदार भावना गवळी यांना ईडीने नोटिस पाठवली आहे. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अनिल परबांच्या वर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपावर अनिल परब यांनी न्यायालयात 100 कोटी अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला आहे.
8 तास चौकशीनंतर अनिल परब ईडी कार्यालयातून बाहेर
8 तास चौकशीनंतर अनिल परब ईडी कार्यालयातून बाहेर पडले. अनिल परब म्हणाले, ‘मला विचारलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी दिली. भविष्यात जेव्हाही मला चौकशीसाठी बोलवलं जाईल मी हजर राहीन’