Continues below advertisement

मुंबई : परिवहन विभागामध्ये (RTO) अतिरिक्त आयुक्त असलेल्या भरत कळसकर (Bharat Kalaskar) यांच्याविरोधात ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी विधान परिषदेत मुद्दा मांडला. त्याने 331 अधिकाऱ्यांकडे बदल्यांसाठी प्रत्येकी 50 लाख रुपये मागितले, त्यापैकी 245 अधिकाऱ्यांनी त्याची मुख्यमंत्री कार्यालयाकडे तक्रार केल्याची माहिती अनिल परब यांनी दिली. भरत कळसकर याने शेल कंपन्यांमध्ये पैसे गुंतवले असल्याचा आरोपही अनिल परब यांनी केला. तसेच या भ्रष्ट अधिकाऱ्यावर काय कारवाई करणार असा प्रश्नही विचारला.

आरटीओमधे अतिरिक्त आयुक्त असलेला अधिकारी भरत कळसकर हा अधिकारी त्याच्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना काम कसं करायचं हे सांगतो. आतापर्यंत त्याने 600 अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्याचं तो सांगतोय. माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे असं तो सांगतोय. आता हे ब्रह्मास्त्र कोण आहे याची माहिती समोर आणा अशी मागणी अनिल परब यांनी केली.

Continues below advertisement

मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी

अनिल परब म्हणाले की, "331 अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठी भरत कळसकर याने प्रत्येकी 50 लाखांची मागणी केली. त्यापैकी पहिले 10 लाख रुपये द्या, मग पोस्टिंग करतो असं तो म्हणाला. त्यापैकी 245 अधिकाऱ्यांनी त्याची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली. या गोष्टीची माहिती मंत्र्यांना नाही हे मला माहिती आहे. कारण मंत्र्यांना याची काहीच माहिती नाही. या 245 तक्रारींची चौकशी करा आणि त्याच्यावर काय कारवाई करायची ते हे सांगा.

मला कुणी रोखू शकत नाही

अनिल परब म्हणाले की, "भरत कळसकर इतर अधिकाऱ्यांना म्हणतोय की त्याला कोणीही रोखू शकत नाही. माझ्याकडे आमदार, खासदार पत्र पाठवत असतात. मी ते पत्र कचऱ्याच्या टोपलत टाकत. मी अंधेरी बोगस लायसन्स दिली. माझे आता केवळ 7 महिने राहिले आहेत. अधिवेशनाच्या काळात आरोप प्रत्यारोप होत असतात, मात्र मी अतिरेकी आहे मला कोणी रोखू शकत नाही असं तो अधिकारी म्हणतोय."

त्याच्याकडे कोणतं ब्रह्मास्त्र?

भरत कळसकरबद्दल बोलताना अनिल परब म्हणाले की, "तो अधिकारी इतरांना सांगतोय की तुम्ही काही काम करू नका. कोणाला कुठे कुठे जायचं आहे, ते तुम्ही मला सांगा, मी करेन. मी 600 लोकांचं प्रमोशन केलंय. दोन प्रोजेक्ट केलेत. तुम्हाला मी मोठ करणार. माझ्या तक्रारी होतात, पण मला त्याचं काही नाही. माझ्याकडे ब्रह्मास्त्र आहे. मला जे करायचं आहे ते मी करतो."

शेल कंपन्यात पैसा गुंतवला

अनिल परब म्हणाले की, "या अधिकाऱ्याने मेसर्स आणि अशा नावाच्या काही शेल कंपन्या बनवल्या आहेत. फक्त रजिस्टर केलेल्या 3 कंपन्या आहेत. या कंपन्यांचे व्यवहार झालेले नाहीत, मग पैसे आले कुठून? हे काळे पैसे शेल कंपनीत टाकून बाहेर येतात असा दावा अनिल परब यांनी केला. या अशा अधिकाऱ्यांवर आपण काय कारवाई करणार आहात? मी आज एवढे पुरावे दिले आहेत, त्यामुळे याची चौकशी तुम्ही लावणार आहात का? जर मंत्र्यांनी त्याला वाचवलं तर मला नाईलाजाने म्हणाव लागेल की हे सगळं मंत्र्यांच्या आशीर्वादाने सुरू आहे."

आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेल्या अडीच वर्षात मला ईडी आणि आयटीचा अभ्यास करायला मिळाला. या केसेस कशा कशा तयार होतात हे मागच्या अडीच वर्षांत कळलं असं अनिल परब म्हणाले.

ही बातमी वाचा: