Anil Deshmukh Update : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख  (Anil Deshmukh)  यांना ठोठावण्यात आलेली ईडी  (ED) कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे. आणि कोर्टात पुन्हा ईडीकडून देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर आता त्यांना बेल मिळणार की पुन्हा एकदा ईडी कोठडी ते पाहवं लागेल. गृहमंत्री अनिल देशमुख यांना ठोठावण्यात आलेली ईडी कोठडी आज संपणार आहे. त्यामुळे आज पुन्हा एकदा त्यांना कोर्टात हजर केले जाणार आहे... आणि कोर्टात पुन्हा ईडीकडून देशमुखांची कस्टडी मागण्याची शक्यता वर्तवली जातेय. तर आता त्यांना बेल मिळणार की पुन्हा एकदा ईडी कोठडी ते पाहवं लागेल.



माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे पुत्र हृषिकेश देशमुख काल ईडी चौकशीला हजर राहिले नव्हते.  कायदेशीर मार्गांची चापणी केल्यानंतरच ईडी चौकशीला हजर राहणार असल्याची माहिती देशमुख कुटुंबियांचे वकील इंद्रपाल सिंह यांनी दिली होती. तर यासाठी हृषिकेश देशमुख यांनी ईडीकडे 15 दिवसांची मुदत देखील मागितल्याच्या माहितीही त्यांनी दिली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात अनिल देशमुख यांचे पुत्र हृषिकेश देशमुख यांना चौकशीला हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.



पाचवेळा अनिल देशमुखांना ईडीचं समन्स 
ईडीनं पाचवेळा अनिल देशमुखांना ईडीचं समन्स पाठवलं. वैद्यकीय कारणं, सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेली सुनावणी, अशी कारणं अनिल देशमुखांकडून सांगण्यात आली. पण अचानक अनिल देशमुख चौकशीला हजर राहिले आणि त्यानंतर प्रदीर्घ चौकशीनंतरही समाधान झालं नाही म्हणून ईडीनं देशमुखांना अटक केली. अनिल देशमुखांना अटक झाली ते कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात. पण हे आरोप करणारे परमबीर सिंह अद्यापही गायबच आहेत. विशेष म्हणजे परमबीर सिंह यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. आणि हाच मुद्दा महाविकास आघाडीनं पकडून भाजपवर आरोप केले आहेत.