मुंबई : उद्या अंगारकी चतुर्थी. अंगारकीच्या निमित्तानं मुंबईकरांचं आराध्य दैवत असलेल्या सिद्धिविनायकाची पूजा 'एबीपी माझा'च्या प्रेक्षकांना घरबसल्या पाहता येणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच 'माझा'च्या प्रेक्षकांना ही पूजा घरबसल्या लाईव्ह पाहण्याची संधी मिळणार आहे.


आज रात्री 12 वाजल्यापासून उद्या पहाटे पाच वाजेपर्यंत सिद्धिविनायकाची पूजा होणार आहे. ही संपूर्ण पूजा सलग पाच तास 'माझा'वर भक्तांना पाहता येणार आहे. पहिल्यांदाच घरबसल्या सिद्धिविनायकाची पूजा पाहण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.



सिद्धिविनायकाचं दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून भक्त मुंबईत येतात. विशेषतः दर मंगळवार, संकष्टी, अंगारकी चतुर्थी, माघी गणपती, गणेशोत्सव या काळात भक्तांची रीघ लागते. अंगारकीला रात्रीच्या वेळी होणारी पूजा पाहण्याची संधी फक्त महाराष्ट्रच नव्हे, तर देश आणि जगभरातील प्रेक्षकांना घरबसल्या मिळणार आहे.

फक्त टेलिव्हिजनच नव्हे, तर 'एबीपी माझा'च्या फेसबुक पेजवरुनही सिद्धिविनायकाची पूजा लाईव्ह पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. 'माझा'च्या फेसबुक पेजवर रात्री बारा वाजल्यापासून या पूजेचं थेट प्रक्षेपण पाहता येईल.