मुंबई : मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटासह पावसाची दमदार बॅटिंग सुरु आहे. अचानक आलेल्या पावसामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली.

इथे दुपारपासूनच काळोख पसरला होता. आभाळ भरुन आलं, त्यानंतर आता पावसाला सुरुवात झाली आहे. दक्षिण, पश्चिम, मध्य मुंबईसह उपनगर आणि नवी मुंबईत दमदार पाऊस सुरु आहे.

दरम्यान, आजपासून सुरु होणाऱ्या अंडर-17 फुटबॉल विश्वचषकचा सामना नवी मुंबईतल्या डीवाय पाटील स्टेडिअममध्ये खेळवला जाणार आहे. त्यातच जोरदार पावसाने हजेरी लावली आहे.