Andheri Bypoll Election : अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये ही प्रतिष्ठेची लढाई मानली जात आहे. मात्र महाराष्ट्र विधानसभेच्या अंधेरी पूर्व या मतदारसंघाच्या एका जागेसाठीच्या या पोटनिवडणुकीत 14 उमेदवारांची नामनिर्देशनपत्रे वैध ठरली आहेत. आज छाननीअंती 14 उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर येत्या सोमवारी म्हणजेच 17 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे.
वैध ठरलेल्या उमेदवारांची नावे आणि त्यांचा पक्ष पुढीलप्रमाणे
१. श्रीमती ऋतुजा रमेश लटके (शिवसेना - उद्धव बाळासाहेब ठाकरे)
२. श्री.मुरजी कानजी पटेल (भारतीय जनता पार्टी)
३. श्री.राकेश अरोरा (हिंदुस्थान जनता पार्टी)
४. श्री.बाला व्यंकटेश विनायक नाडार (आपकी अपनी पार्टी - पीपल्स)
५. श्री.मनोज श्रावण नायक (राईट टू रिकॉल पार्टी)
६. श्री.चंदन चतुर्वेदी (अपक्ष)
७. श्री.चंद्रकांत रंभाजी मोटे (अपक्ष)
८. श्री.निकोलस अल्मेडा (अपक्ष)
९. श्रीमती नीना खेडेकर (अपक्ष)
१०. श्री.पहल सिंग धन सिंग आऊजी (अपक्ष)
११. श्रीमती फरहाना सिराज सय्यद (अपक्ष)
१२. श्री.मिलिंद कांबळे (अपक्ष)
१३. श्री.राजेश त्रिपाठी (अपक्ष)
१४. श्री.शकिब जाफर ईमाम मलिक (अपक्ष).
याबाबत अधिक माहिती देताना मुंबई उपनगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी निधी चौधरी यांनी सांगितले की, आज छाननीअंती १४ उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे वैध ठरली आहेत. तर येत्या सोमवारी म्हणजेच दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ रोजी अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत आहे. याचबरोबर जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी अंधेरी पूर्व विधानसभा मतदार संघाच्या या पोटनिवडणुकीसाठी जास्तीत जास्त मतदान करण्याचे आवाहनही मतदारांना केले आहे.
अंधेरी पूर्व मतदारसंघासाठी केंद्रीय निवडणूक निरीक्षकांची नियुक्ती
या पोटनिवडणुकीसाठी सर्वसामान्य केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून देवेश देवल (आय. ए.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 9372886717 हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02231400536 आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी 10 ते 11 या कालावधीत जनतेला भेटतील.
पोलीस केंद्रीय निरीक्षक म्हणून कोया प्रवीण (आय.पी.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक 8355873926 हा असून कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 02231400573 आहे. ते इंडियन ऑईल रेस्ट हाऊस, बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई येथे सकाळी 11 ते दुपारी 12 या कालावधीत जनतेला भेटतील. त्याचप्रमाणे निवडणूक खर्च केंद्रीय निरीक्षक म्हणून सत्यजित मंडल (आय.आर.एस.) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ही बातमी देखील वाचा