Monsoon Rain Updates : गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा असलेले नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सूनचे (Monsoon Rain Updates) राज्यात रविवारी (दि.25) आगमन झाले. हवामान खात्याकडून रविवारी यासंदर्भातील अधिकृत घोषणा करण्यात आली. कालच मान्सून (Monsoon Rain Updates) केरळात दाखल झाला होता. त्यानंतर मान्सून महाराष्ट्रात पोहोचण्यासाठी एक ते दोन दिवस जातील, असा अंदाज होता. मात्र, महाराष्ट्रात मान्सूनसाठी अत्यंत पोषक स्थिती असल्याने अवघ्या काही तासांमध्ये मान्सून (Monsoon Rain Updates) राज्यात दाखल झाला आहे. काही वेळात हवामान याबाबतची अधिकृत घोषणा करणार आहे. 

Continues below advertisement






यंदा मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल


दरवर्षी मान्सून साधारणपणे 7 जूनच्या आसपास राज्यात दाखल होतो. मात्र, यंदा मान्सून 12 दिवस आधीच महाराष्ट्रात दाखल झाला आहे. मान्सूनची एकूण आगेकूच पाहता पुढील काही तासांमध्ये मान्सून मुंबई आणि पुण्यात दाखल होईल, असा अंदाज आहे. आज सकाळपासून मुंबई, उपनगर आणि ठाणे परिसरात ढगाळ वातावरण आहे.


गोव्यातही मुसळधार पावसाला सुरुवात 


गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत असून गोव्यातील रस्त्यांना नदीचं स्वरूप आले आहे. गोव्यात मुसळधार पाऊस कोसळत असून गोव्याला आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. गोवा म्हापसा येथे घरामध्ये, बाजारपेठेत पावसाचे पाणी गेल. गोव्यात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते जलमय झालेत. 


हवामान खात्याने मुंबई आणि ठाण्याला रविवारी यलो अलर्ट दिला आहे. तर रायगडला ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. गेल्या काही दिवसांपासून तळकोकणात मुसळधार पाऊस सुरु आहे. वादळी वाऱ्यामुळे तळकोकणात अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता.


मान्सूनचे आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. राज्यातील बहुतांश शेतकरी हे खरिपाच्या शेतीसाठी मान्सूनच्या पावसावर अवलंबून असतात. त्यामुळे मान्सूनच्या आगमानाने शेतकरी सुखावले आहेत. तसेच मान्सून आल्याने गेल्या दोन-तीन महिन्यांपासून उकाड्याचा सामना करणाऱ्या सर्वसामान्यांनीही सुटकेचा निश्वास टाकला आहे.


अलिबागसह रायगड जिह्यातील अन्य समुद्र किनाऱ्यावर शुकशुकाट... 


दुसरीकडे किनारपट्टी भागात हवामान विभागाने दिलेल्या चक्री वादळाचा इशाऱ्यामुळे रायगड जिल्ह्यातील अनेक पर्यटन स्थळ ओस पडली आहेत. त्यामुळे मत्स्यव्यवसायावर देखील याचा मोठा फटका बसला आहे. अलिबाग मधील अनेक समुद्र किनारे आज रविवार असून देखील ओस पडले आहेत. त्यामुळे अनेक व्यावसायिक संकटात सापडले आहेत.


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Ujani Dam Solapur : मान्सूनपूर्व पावसाचा धडाका! उजनी धरणात 4 टीएमसी पाणीपातळी वाढ, तर चंद्रभागा एक मीटरने वधारली