मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे आणि मिताली बोरुडे आज विवाहबंधनात अडकणार आहेत. अवघ्या काही वेळेतच अमित आणि मितालीचा लग्नसोहळा पार पडणार आहे. राज ठाकरे आणि कुटुंबीय परळच्या सेंट रेजिस हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. शिवाय लग्नासाठी पाहुणेमंडळीही सेंट रेजिस हॉटेलमध्ये यायाला सुरुवात झाली आहे. बाबासाहेब पुरंदरे, जयदेव ठाकरे ही मान्यवर मंडळीही वधूवरांना आशीर्वाद देण्यासाठी दाखल झाले आहेत. उद्धव ठाकरे यांच्या कुटुंबासह, रतन टाटा, उद्योग क्षेत्रातील मंडळी आणि चित्रपट सृष्टीतल्या कलाकारांनाही याचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

अमित ठाकरेंचा विवाहसोहळा :