मुंबई : भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली. यावेळी अमित शाहा यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेही उपस्थित होते. पण या बैठकीतून रावसाहेब दानवेंना वगळल्याची माहिती माझाच्या सूत्रांनी दिली.
भाजप अध्यक्ष अमित शाहांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी अमित शाह आणि उद्धव ठाकरेंमध्ये जवळपास दीड तास चर्चा झाली. मातोश्रीमधील दुसऱ्या मजल्यावर चर्चा झाली.
या चर्चेत सहभागी होण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे उपस्थित होते. मात्र बैठकीतून रावसाहेब दानवेंना वगळल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. विशेष म्हणजे, या बैठकीत युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे हेदेखील उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी रावसाहेब दानवेंनी शेतकऱ्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्यामुळे त्यांना चर्चेतून वगळण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. रावसाहेब दानवेंना या बैठकीतून वगळल्यानं त्यांना मातोश्रीच्या सभागृहातच बसून राहावं लागलं.