लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी शिवसेना-भाजप यांच्या युतीची बोलणी पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. लोकसभा निवडणुकीसाठी 23-25 आणि विधानसभा निवडणुकीसाठी 50-50 टक्क्यांचा फॉर्म्युला ठरल्याचं बोललं जात आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरु असलेल्या युतीच्या चर्चेला आज पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
त्या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांना विचारलं असता ते म्हणाले की, "अमित शाह आज संध्याकाळी 'मातोश्री'वर येणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील. यानंतर ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटणार आहेत. मग दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होईल. युतीचे जे काही फॉर्म्युले आहेत, त्याबाबत सर्व दोन्ही प्रमुख नेते घोषणा करतील."
तसंच राज्यात 'अब की बार उद्धव सरकार', अशी घोषणाही संजय राऊत यांनी केली.
भाजप-शिवसेना युतीची बोलणी पूर्ण, आज संयुक्त पत्रकार परिषदेत युतीच्या घोषणेची शक्यता
भाजपचं एक पाऊल मागे
युती व्हावी यासाठी भाजपने एक पाऊल मागे घेतलं आहे. भाजपने मित्रपक्ष शिवसेनेसाठी अडून बसलेल्या पालघरच्या जागेवरही पाणी सोडलं आहे, अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसंच विधानसभेसाठी शिवसेनेची 50-50 च्या फॉर्म्युलाची मागणीही मान्य झाल्याचं कळतं आहे. त्यानुसार शिवसेना-भाजप विधानसभेची निवडणूक प्रत्येकी 144-144 जागांवर लढणार आहेत.
गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजपमध्ये युती होणार की नाही यावर राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. मात्र शिवसेनेने गेल्या काही महिन्यापासून आक्रमक पवित्रा घेतला होता. भाजपवर टीका करण्याची एकही संधी शिवसेनेच्या नेत्यांची सोडली नव्हती. याच आक्रमक भूमिकेचा शिवसेनेला फायदा मिळाल्याचं दिसून येत आहे.
व्हिडीओ