अंबरनाथ : अंबरनाथ एमआयडीसीत निकृष्ट दर्जाचं दर्जाचं फरसाण तयार करणाऱ्या कंपनीत मनसेने आज तोडफोड केली. या कंपनीत अत्यंत घाणेरड्या वातावरणात खाद्यपदार्थ तयार करण्याचं काम सुरु होतं



अंबरनाथ एमआयडीसीतल्या जीआयपी धरण परिसरात एक शेड उभारुन तिथे फरसाण तयार केलं जात असल्याची बाब समोर आली होती. या शेडमध्ये उंदीर, मांजर, सरडे, माशा यांचा अक्षरशः सुळसुळाट होता. शिवाय निकृष्ट साहित्य, गलिच्छ वातावरण, काम करणाऱ्या कामगारांचं अस्वच्छ राहणीमान यामुळे लोकांच्या जीवाशी खेळ सुरु होता.

याबाबत स्थानिकांनी या कंपनीत जाऊन जाब विचारला असता मालकाने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्यामुळे संतावलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी आज सकाळी या कंपनीत जाऊन तोडफोड केली आणि सगळं साहित्य फेकून दिलं.

दरम्यान, या कंपनीला कुठलाही परवाना देण्यात आला नसल्याचा स्थानिकांचा आरोप असून कंपनी बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.