मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादीच्या महाआघाडीत समविचारी पक्षांना सामवून घेण्याचा प्रयत्न सुरु असल्याचं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सांगितलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला संविधानाच्या चौकटीत आणण्याची मागमी भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सातत्याने करत आहेत. त्यावर बोलताना, आरएसएस बद्दल नेहमीच भूमिक स्पष्ट ठेवली आहे. आमचा आरएसएसच्या विचारधारेला नेहमीच विरोध असल्याचं शरद पवारांनी स्पष्ट केलं.


काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आरएसएसच्या विचारधारेशी संघर्ष आहे. या शक्तीपासून समाजाची सुटका कशी होईल, ही सगळ्य़ांची जबाबदारी आहे आणि त्यात कोणतीही नाही, असंही शरद पवार यांनी म्हटलं. आरएसएसचे विचार नाही पटत यापेक्षा आणखी काय आश्वासन हवं, असं प्रकाश आंबेडकरांना उद्देशून शरद पवार म्हणाले.


माढा मतदारसंघातून मी पंतप्रधान पदासाठी उभा राहणार नाही. निवडणुकीतील यश अपयश मतदार ठरवतील आणि त्यांनी दिलेला निर्णय मला मान्य असेल, असं शरद पवारांनी म्हटलं. तर शेतकरी प्रश्नावर स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टींची भूमिका समंजसपणाची होती, त्यामुळे त्यांना एकत्र घेण्यासाठी प्रयत्न करतोय. त्यांच्याशी याबाबत सुसंवाद सुरु आहे, अशी माहितीही शरद पवारांनी दिली.


व्हिडीओ - काँग्रेस-राष्ट्रवादीचा आरएसएसच्या विचारधारेशी संघर्ष : शरद पवार