मुंबई : मुंबईतील पावसाचा जोर वाढताना दिसतो आहे. त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून आज (20 सप्टेंबर) मुंबईतील सर्व शाळा आणि कॉलेज बंद राहणार आहेत. राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी याबाबत एबीपी माझाला माहिती दिली.


मुंबईत मुसळधार पाऊस कोसळतो आहे. काल (19 सप्टेंबर) दुपारपासून मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. याच पार्श्वभूमीवर राज्याच्या शिक्षण खात्याने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

https://twitter.com/TawdeVinod/status/910196316394872833

गेल्या सात तासांपासून मुंबई आणि परिसरात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे मुंबईकरांचे हाल झाले आहेत. दुपारी दोन वाजल्यापासून मुंबईत पावसाला सुरुवात झाली. अचानक मुंबईवर काळे ढग दाटून आले. धो-धो पाऊस बरसत आहेत.