मुंबई : नोटाबंदी आणि जीएसटीनंतर मुंबईतील महागड्या प्रॉपर्टीच्या दरात घसरण पहायला मिळते आहे. या कमी झालेल्या दराचा फायदा घेत बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनी अलिशान घरं खरेदी केल्याचं समोर आलं आहे.
अभिनेता अक्षय कुमारनं अंधेरीतील ट्रान्सकॉन ट्रायम्फ नावाच्या 38 मजली इमारतीतील 21 व्या मजल्यावर 4 फ्लॅट्स खरेदी केले आहेत. प्रत्येक फ्लॅट दोन हजार चौरस फुटांचा असून त्यांची किंमत 18 कोटी रुपयांच्या घरात असल्याचं बोललं जातं आहे.
तर टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली यानंही वरळीमध्ये तब्बल 35 कोटी रुपयांचा एक अलिशान फ्लॅट खरेदी केला आहे. विराटचा फ्लॅट 35 व्या मजल्यावर असून या फ्लॅटमधून समुद्र आणि वांद्रे-वरळी सीलिंकचा सुखद नजारा दिसतो.
विशेष म्हणजे, या फ्लॅटमध्ये स्वीमिंग पूल आणि जीमचीही सुविधा आहेत. सध्या या फ्ल़ॅटच्या इंटिरिअरचं काम सुरु आहे.
दरम्यान, नोटाबंदी आणि जीएसटीमध्ये बांधकाम क्षेत्रात कमालीची मंदी आली. त्यामुळे घरांच्या किमतीत मोठी घसरण झाली. याचाच फायदा घेत, अनेक सेलिब्रिटींनी घर खरेदी केली असल्याचं बोललं जात आहे.
...म्हणून बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंकडून अलिशान घरांची खरेदी!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Nov 2017 09:37 PM (IST)
नोटाबंदी आणि जीएसटीनंतर मुंबईतील महागड्या प्रॉपर्टीच्या दरात घसरण पहायला मिळते आहे. या कमी झालेल्या दराचा फायदा घेत बॉलिवूड सेलिब्रिटी आणि क्रिकेटपटूंनी अलिशान घरं खरेदी केल्याचं समोर आलं आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -