LIVE UPDATES | होळीच्या सणावर शहर पोलिसांकडून वर्ध्यात साडेचार लाखांचा दारूसाठा जप्त
महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज (6 मार्च) सादर होणार आहे. उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधीसभेत सकाळी अकरा वाजता अर्थसंकल्प मांडतील.
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
06 Mar 2020 10:50 PM
मुंबई : कोरोना व्हायरसचा प्रसार होऊ नये यासाठी मुंबई महापालिकेने पुढाकार घेतलाय. मुंबई महापालिकेच्या अंतर्गत असणाऱ्या रुग्णालयातील शिकावू डॉक्टरांची टीम मुंबई विमानतळावर रुग्णांची तपासणी करणार आहे. लोकमान्य टिळक रुग्णालय, केम, नायर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय, कूपर रुग्णालय, शताब्दी हॉस्पिटल या रुग्णालयातील मिळून एकूण 35 शिकावू डॉक्टरांच्या टीमकडून विमानतळावर तीन शिफ्टमध्ये काम करण्यास आजपासून सुरुवात झालीय. सकाळी 8 ते दुपारी 2,दुपारी 2 ते रात्री 8 आणि रात्री 8 ते सकाळी 8 या वेळेत डॉक्टरकडुन कामास सुरुवात झालीय. शिकावू डॉक्टरांच्या सोबतीला 11 कार्यकारी वैद्यकीय अधिकारी, रहिवासी डॉक्टर देखील उपस्थित.
वर्ध्यातील दयालनगर परिसरात एका बंद घरात दारुसाठा असल्याची माहिती मिळाली. या आधारावर बंद घराची शहर पोलिसांनी पाहणी केली. यावेळी दारुसाठा आढळून आला. यामध्ये ओसी कंपनीच्या 29 पेट्या आणि ओसी ब्ल्यू कंपनीच्या 13 अश्या एकूण 42 पेट्या इंग्रजी दारू जप्त करण्यात आली. पोलिसांनी साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त केलाय.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौ-यावर पावसाचं सावट, अयोध्येत मुसळधार पावसाला सुरुवात
बीड : दहावीच्या परीक्षा केंद्रावर तरुणाकडं आढळलं पिस्तूल, बीडपासून काही अंतरावर असलेल्या जवळा परीक्षा केंद्रावरील घटना, पिंपळनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये येणाऱ्या परीक्षा केंद्रावर पोलीस बंदोबस्तातील प्रकार, दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं
सोलापुरातील अक्कलकोटमध्ये लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलीय. धक्कादायक बाब म्हणजे मुलाने लग्नास नकार दिल्याने या मुलीने आत्महत्या केलीय. गेल्या काही दिवसांपासून पीडित मुलगी आणि आरोपी यांच्यामध्ये प्रेमसंबंध होते. आरोपी विशाल राठोड याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वेळोवेळी बलात्कार केला. ज्यावेळी मुलीने लग्नासाठी विचारणा केला त्यावेळी त्याने लग्नास नकार दिला. यामुळे मुलीने गावातील विहिरीत उडी घेत आज सकाळी आत्महत्या केली. त्यानंतर हा सगळा प्रकरण उघडकीस आला. दरम्यान आरोपी विशाल राठोड(वय 24)यास पोलिसांनी तात्काळ अटक केलीय. अक्कलकोट ग्रामीण पोलिसात कलम 305, 376, पॉस्को कलम 4, 8, 12 अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अकोल्यात एका बँक कर्मचाऱ्यांनं तीन अल्पवयीन मुलांचं लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. जयप्रकाश गावंडे असं या आरोपी बँक कर्मचाऱ्यांचं नाव आहे. तो शहरातील गुडधीचा रहिवाशी आहे. गावंडे हा शहरातील एका अर्बन बँकेत लिपीक म्हणून कार्यरत आहे. आरोपी तेरा ते चौदा वयोगटातील मुलांना चॉकलेटचं आमिष दाखवत लैंगिक शोषण करायचा. हा प्रकार एका मुलांच्या नातेवाईकांच्या लक्षात आला. याप्रकरणी मुलांच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून सिव्हील लाइन पोलीसांनी गावंडेविरोधात रात्री गुन्हा दाखल केलाय. त्याला रात्री उशिरा अटक करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात पीडित मुलांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
सोलापूरात NPR वर बहिष्कार टाकण्यात येणार असल्याची भूमिका जमाते उलमा हिंदच्या वतीने घेण्यात आली आहे. सोलापूर शहरात साधारण 300 मशीद आहेत. या मशीदमधून आज या संदर्भात घोषणा करण्यात आली. तसेच उलमा ये हिंदसाठी सभासद नोंदणी करण्यात आली. आज जवळपास 10 हजार मुस्लीम नागरिकांनी सदस्यत्व स्वीकारलं. येणाऱ्या काळात हे सर्व सभासद देखील NPR वर बहिष्कार टाकण्यासाठी समजात जनजागृती करणार आहेत.
वसई : पेन्सिलला वेलवेटचा कोट लावण्याचा व्यवसाय घरबसल्या करण्याचं आमिष दाखवून, जवळपास 300 ते 400 नागरिकांना 4 ते 5 कोटीचा गंडा एका कंपनीने घातला आहे. बेली इन्टरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. घरबसल्या स्वतःची कंपनी टाकून, महिन्याला 30 ते 40 हजार कमवण्याचं स्वप्न या कंपनीने दाखवलं होतं. 4 ते 6 हजार किमतीची मशीन या कंपनीनं ग्राहकांना जवळपास 63 हजारांना वसई : पेन्सिलला वेलवेटचा कोट लावण्याचा व्यवसाय घरबसल्या करण्याचं आमिष दाखवून, जवळपास 300 ते 400 नागरिकांना 4 ते 5 कोटीचा गंडा एका कंपनीने घातला आहे. बेली इन्टरनॅशनल असं या कंपनीचं नाव आहे. घरबसल्या स्वतःची कंपनी टाकून, महिन्याला 30 ते 40 हजार कमवण्याचं स्वप्न या कंपनीने दाखवलं होतं. 4 ते 6 हजार किमतीची मशीन या कंपनीनं ग्राहकांना जवळपास 63 हजारांना विकली होती.
विकली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून अमृता फडणवीस वेगवेगळ्या वादात सापडल्या आहेत. यावरुन सोशल मीडियावर त्या अनेकदा ट्रोलही झाल्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी एबीपी माझाला एक्स्लुसीव्ह मुलाखत दिली आहे. या सर्व वादावर त्यांनी बिनधास्त उत्तरे दिली आहेत.
सोलापूर : सोलापुरातील मंद्रुप येथे दहावीचा पेपर फुटल्याच्या चर्चा; गावातील झेरॉक्स सेंटरमधून उत्तरांची प्रत विकली जात असल्याचा विडिओ समोर. आज राज्यभरात दहावीच्या विद्यार्थ्यांचा होता हिंदी विषयाचा पेपर.
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील महिलांच्या लैंगिक छळाबाबतचा अहवाल दडपून ठेवला. विद्यापीठाच्या स्त्री अभ्यास केंद्राच्या संचालक डॉ. मेधा नानिवडेकर यांचा आरोप. 'विद्यापीठातील महिला अत्याचाराची प्रकरणं जाणीवपूर्वक दडपली जातात' वेळोवेळी पत्रं देऊन सुद्धा कुलगुरूंनी अहवाल खुला का केला नाही? असा सवाल त्यांनी केलाय. शिवाजी महाराज यांच्या नावाला बट्टा लावू नका : डॉ. मेधा नानिवडेकर. मी याचिकाकर्ती आहे त्यामुळे चौकशी कशी केली याची माहिती मिळालीच पाहिजे : डॉ. मेधा नानिवडेकर
पश्चिम महाराष्ट्रातील 44 जण इराणमध्ये अडकले, खासदार श्रीनिवास पाटील यांचं पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्र्यांना पत्र, कोरोनामुळे अडकलेल्या लोकांच्या मदतीसाठी खासदार पाटील यांचे प्रयत्न
सोन्याच्या दराने आज ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. सोन्याचा आजचा भाव 45 हजारांच्याही वर गेला आहे.
2 हजार 110 कोटी महिला बालकल्याण विभागाला देण्यात येणार आहे. महिला सुरक्षा प्राधान्य : अजित पवार
आमदार फंड दोन कोटींवरुन तीन कोटींवर : अजित पवार
एसटीसाठी नव्या बसेस विकत घेण्यासाठी तसेच बस डेपो विकसित करण्यासाठी 400 कोटींचा निधी उपलब्ध करून देणार, तसेच जुन्या बस बदलून नव्या अत्याधुनिक बस उपलब्ध करून देण्यात येणार : अजित पवार
स्थानिकांना रोजगार मिळावेत यासाठी सरकार आग्रही, ८० टक्के नोकऱ्या स्थानिकांना मिळण्यासाठी कायदा करणार
अजित पवार यांचा नाट्यप्रेमींना दिलासा
नाट्यसंमेलनासाठीच्या निधीत वाढ, आता10 कोटी अनुदान
जिल्हा वार्षिक योजना 9800 कोटींची तरतूद, तृतीयपंथीयांसाठी वेगळ्या मंडळाची स्थापना, त्यासाठी 5 कोटी रूपयांची तरतूद
प्रत्येकाच्या हाताला काम देण्याचं सरकारचं देण्याचं सरकारचं ध्येय, तरूणांसाठी नवीन उद्योग उभारणीसाठी मदत करणार, बेरोजगार तरूणांना प्रशिक्षण देण्यावर सरकारचा भर : अजित पवार
महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राचं नाव देखील घेतलं नाही. या विभागाचा विसर पडला आहे. : देवेंद्र फडणवीस
केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी राज्यातील रस्त्यांसाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला, यासाठी अजित पवारांकडून गडकरींचे आभार मानले. ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी मोठी योजना हाती घेण्यात येणार आहे. एक हजार कोटींपेक्षा अधिक निधी प्रस्तावित.
दुर्गम भागात आरोग्य सेवा देण्यावर सरकारचा भर, प्राथमिक आरोग्यासाठी 5 हजार कोटींचा निधी: अजित पवार
सर्व ग्रामपंचायतीला 2024 पर्यंत स्वत:चं कार्यालय असेल, सोलापूर आणि पुण्यात नवीन विमानतळ उभारणार : अजित पवार
आर्थिक मंदी परिणाम राज्यावर जाणवत आहे : अजित पवार
कोकणच्या विकासासाठी सरकारचं प्राधान्य, कोकणातील रस्त्यांचा विकास करण्यावर सरकारचा भर : अजित पवार
10 हजार 35 कोटी जलसंपदा विभागासाठी निधी, राज्यातील भूजल पातळीत वाढ करण्याचा प्रयत्न: अजित पवार
पायाभूत सुविधांची किंमत 2 लाख 48 हजार कोटी, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करण्याचा सरकारचा प्रयत्न : अजित पवार
नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार प्रोत्साहनपर देणार
सर्व घटकांचा विकास व्हावा हा उद्देश, जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा देण्यावर भर : अजित पवार
पुणे मेट्रोचा विस्तार करणार, स्वारगेट ते कात्रजर्यंत मेट्रोचा विस्तार करणार
अर्थसंकल्पाआधी राज्य मंत्रीमंडळाची बैठक सुरु
पार्श्वभूमी
मुंबई : महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज सादर होणार आहे. विधीमंडळात सकाळी 11 वाजता राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार अर्थसंकल्प सादर करतील. दरम्यान काल (5 मार्च) राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला. यानुसार राज्याचा जीडीपी 5.7 टक्के राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर अर्थराज्यमंत्री शंभुराजे देसाई विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडतील.
दरम्यान अर्थसंकल्प सादर करण्यापूर्वी सकाळी 10.30 वाजता कॅबिनेट बैठक बोलावली असून त्यात अर्थसंकल्पाला मंजुरी दिली जाईल. त्यानंतर अजित पवार सभागृहात अर्थसंकल्प सादर करतील. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीन पक्षांनी मिळून महाराष्ट्र विकास आघाडी सरकार स्थापन केलं. याआधी अर्थमंत्री म्हणून अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी आघाडी सरकारमध्ये अर्थसंकल्प सादर केला होता. आता ते महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचे अर्थमंत्री अर्थसंकल्प मांडतील. महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा हा पहिलाच अर्थसंकल्प असल्यामुळे त्याकडे सगळ्यांच्याच लक्षं आहे.
राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल सादर; दरडोई उत्पन्नात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर तर कर्जाचा बोजाही वाढला
सरकारने दिलेल्या किती आश्वासनांची, घोषणांची अंमलबजणावणी होणार हे देखील आजच्या अर्थसंकल्पातून समोर येईल. तसंच शेतकरी, गृहिणींच्या विशेषत: शहरातील महिलांना सरकारकडून अपेक्षा आहेत. सार्वजनिक वाहतूक फ्री करावी, महागाई कमी करावी, सुरक्षितता वाढवावी अशा अनेक मागण्या महिलांनी केल्या आहेत. यासोबतच करदाते आणि उद्योजकांना नवीन काय मिळणार? हे देखील पाहावं लागेल. मंदीची स्थिती, घटणारा विकासदर हे आव्हान अजित पवारांसमोर आहे.
आर्थिक पाहणी अहवालात काय?
आर्थिक मंदीमुळे राज्याचा विकास दर 7.5 टक्क्यांवरुन 5.7 टक्के राहिल, असा अंदाज या आर्थिक सर्वेक्षणात नोंदवण्यात आला आहे. तसेच राज्याचा कृषी विकास दर 3.1 टक्के राहिल, अशी शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. तर महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न 1 लाख 91 हजार 737 रुपये असल्याचं यात नमूद करण्यात आलं आहे.
आर्थिक पाहणी अहवालानुसार राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत राज्यात दीड लाख रोजगार कमी झाला आहे, ही चिंतेची बाब आहे. याशिवाय राज्याचा बेरोजगारीचा दर इतर राज्यांच्या तुलनेत सर्वात जास्त आहे. याबाबतीत देशात महाराष्ट्र पाचव्या क्रमांकावर आहे. राज्याचा बेरोजगारी दर 8.3 टक्के आहे.