मुंबई: भाजपसोबत सत्तेत गेल्यानंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) महाविकास आघाडी आणि शरद पवारांच्या संबंधित अनेक भूमिकामध्ये बदल केला, एक भूमिका मात्र त्यांनी कायम ठेवल्याचं समोर आलं आहे. मुंबईतील कोस्टल रोडच्या उद्धाटनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी छत्रपती संभाजी महाराज (Chhatrapati Sambhaji Maharaj) यांचा उल्लेख हा 'स्वराज्य रक्षक' असाच केला. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) मात्र छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख 'धर्मवीर' असाच केला. 


मविआमध्ये घेतलेल्या भूमिकेवर महायुतीमध्येही ठाम


उपमुख्यमंत्री अजित पवार महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते असताना त्यांनी घेतलेल्या एका भूमिकेमुळे राज्यात वादंग निर्माण झाल्याचं पाहायला मिळालं होतं. छत्रपती संभाजी महाराज हे धर्म रक्षक नव्हे तर स्वराज्य रक्षक होते अशा पद्धतीची भूमिका अजित पवार यांनी घेतली होती. 


ही भूमिका घेतल्यानंतर अजित पवार आता वर्षभरानं सत्तेत सहभागी झाले होते. मात्र आजही त्यांनी आपल्या या भूमिकेशी फारकत घेतली नसल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवार यांच्या सोशल मीडिया टीमच्या वतीने छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त सोशल मीडियात अभिवादन करणारा व्हीडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज यांचा स्वराज्य रक्षक असा उल्लेख करण्यात आला.


 






काय म्हणाले अजित पवार? 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबईतील कोस्टल रोडच्या उद्धाटन करण्यात आलं. त्यावेळी झालेल्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित होते. त्यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुण्यतीथीनिमित्ताने त्यांच्या त्यागाला वंदन करतो. मुंबईतील कोस्टल रोडमुळे वेळेची आणि इंधनाची बचत होणार. मुख्यमंत्र्यांनी पुढाकार घेऊन रस्ते कॉन्क्रिटीकरण करुन रस्त्याचे स्वच्छतेचं काम सुरु आहे. हवेचे प्रदूषण कमी होत आहे. नजिकच्या काळात मोठ्या प्रमाणात ग्रीनरी निर्माण होणार असून मुंबईकरांना एक रुपयाही टोल द्यावा लागणार नाही. 


बरेच दिवस मुंबईकरानी हा रस्ता कधी सुरू होणार याची प्रतिक्षा केली होती. मुंबईत मोठ्या प्रमाणात वाहतुकीत बदल करण्याचा विचार महायुतीचा आहे. यामुळे वेळेची आणि इंधनाची बचत होईल. आज देशातील प्रदूषित शहरामध्ये दिल्ली मुंबईचा समावेश आहे. यामुळे आता स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढाकार घेऊन रस्ते धूत आहेत. 


आताच्या काळात जास्तीत जास्त ग्रीनरी होण्यासाठी प्रयत्नशील आहोत. पावणे दोनशे एकर ग्रीन बेल्ट करत आहोत. 300 एकर ग्रीनरी आपल्याला पाहिला मिळेल. अनेक प्रकल्प हातात घेतले आहेत. मंत्रालय, विधानभवन, छोटे छोटे बंगल्यांऐवजी साडे सात हजार एकरचा प्रकल्प हातात घेतला आहे. 


ही बातमी वाचा: