मुंबई: अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्दिकी यांच्यावर शनिवारी रात्री वांद्रे परिसरात गोळीबार करण्यात आला. बाबा सिद्दिकी यांचे पूत्र झिशान सिद्दीकी (baba siddique Firing) यांच्या कार्यालयाबाहेर साधारण आठ ते साडेआठच्या सुमारास ही घटना घडली. यामध्ये बाबा सिद्दिकी यांचा मृत्यू झाला आहे. बाबा सिद्दिकी यांच्या छातीत तीन गोळ्या घुसल्याने ते गंभीररित्या जखमी झाले होते. येथील खेरवाडी जंक्शनजवळ असणाऱ्या सिग्नलवर बाबा सिद्दिकी यांच्यावर गोळीबार करण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार, तीन व्यक्तींनी बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळीबार केला आणि ते पसार झाले. हे लोक नक्की कोण होते आणि त्यांनी बाबा सिद्दिकी यांच्यावर का गोळीबार केला, याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
बाबा सिद्दिकी यांना गोळीबार झाल्यानंतर लिलावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यांना तीन गोळ्या लागल्या होत्या. छाती आणि डोक्याच्या जवळ त्यांना गोळ्या लागल्याची माहिती आहे. बाबा सिद्दिकी यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. बाबा सिद्दिकी हे पूर्वी काँग्रेस पक्षात होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवार गटात प्रवेश केला होता. बाबा सिद्दिकी हे मुंबईतील नामवंत चेहऱ्यांपैकी एक आहेत. ईदच्या काळातील बाबा सिद्दिकी यांची ईफ्तार पार्टी नेहमी चर्चेचा विषय असते. त्यांच्या इफ्तार पार्टीला बॉलिवूड सेलिब्रिटी आणि बडे राजकारणी हजेरी लावायचे.
आणखी वाचा