Adulterated Ghee : ऐन दिवाळीच्या (Diwali 2022) तोंडावर मुंबईतून (Mumbai) सुमारे तीन लाख रुपयांचं संशयित भेसळयुक्त तूप (Adulterated Ghee)जप्त करण्यात आलं आहे. मुंबईतील अन्न व औषध प्रशासनाने (Food and Drug Administration) ही कारवाई केली आहे. दिवाळीच्या तोंडावर अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई कार्यालयाने अन्नसुरक्षा कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या तुपावर कारवाई केली आहे.

मस्जिद बंदर इथे गोदामावर कारवाईमुंबईतील प्रशासनाच्या दक्षता विभागाला 18 ऑक्टोबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार मस्जिद बंदर इथल्या ऋषभ शुद्ध तूप भांडार गोडाऊनवर ही कारवाई करण्यात आली. गोदामातून 2 लाख 99 हजार 90 रुपये किंमतीचा 400 किलो तूप जप्त करण्यात आला आहे. यासोबतच तुपाचे नमुने विश्लेषणासाठी घेण्यात आले. हे नमुने विश्लेषणासाठी पाठवण्यात आले असून अहवालाच्या अनुषंगाने पुढील आवश्यक कारवाई केली जाईल.

दिवाळीसारख्या सणाच्या दिवसात ग्राहकांना सुरक्षित आरोग्यदायी आणि सकस अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत यासाठी अन्न नमुने तपासण्याची विशेष मोहीम हाती घेतली आहे. तसंच अन्न सुरक्षा आणि मानके कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी दिले आहेत.

दिवाळीत भेसळयुक्त पदार्थांची विक्रीदिवाळीच्या दिवसांमध्ये मिठाईंची विक्री मोठ्या प्रमाणात होते. या काळात मिठाईला मोठ्या प्रमाणात मागणी होत असल्याने त्याचा गैरफायदाही घेतला जातो.  यामुळे या मिठाईत बनावट पदार्थ मिसळण्याची शक्यताही असते. बाजारात असलेली मिठाई शुद्ध खव्यापासून किंवा शुद्ध तुपापासूनच बनवलेली असेल याची कोणतीही शाश्वती नसते. अशातच व्यापाऱ्यांकडून भेसळयुक्त आणि बनावट पदार्थ ग्राहकांच्या माथी मारण्याचा प्रयत्न होत असतो. या वस्तूंमुळे आरोग्यास मोठा धोका होऊ शकतो.

पुण्यातील दौंडमध्ये भेसळयुक्त गूळ जप्तअन्न व औषध प्रशासनाने ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला पुणे जिल्ह्यातील गूळ उत्पादकांवर मोठी कारवाई केली होती. दौंड तालुक्यातील दापोडी आणि केडगाव येथील तीन गूळ उत्पादकांवर ही कारवाई करण्यात आली. यामध्ये सुमारे पाच लाख 33 हजार 870 रुपये किंमतीचा भेसळयुक्त गुळ आणि साखर जप्त करण्यात आली आहे.

अकोल्यात भेसळयुक्त मिठाई जप्तदरम्यान पाच दिवसांपूर्वीच म्हणजे 14 ऑक्टोबर 2022 रोजी अकोला इथल्या अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन विविध ठिकाणी कारवाई करत 1 लाख 6 हजार 600 रुपये किंमतीची 486 किलो भेसळयुक्त मिठाई जप्त केली होती. 

इतर महत्त्वाची बातमी

Food and Drug Administration Action : पुणे जिल्ह्यातील तीन गूळ उत्पादकांवर कारवाई, पाच लाखाहून अधिक किंमतीचा भेसळयुक्त गुळ जप्त