मुंबई : स्टॅण्ड कॉमेडियन कुणाल कामराने 'शट अप या कुणाल' या पॉडकास्टमध्ये नुकतीच शिवसेना खासदार संजय राऊत यांची मुलाखत घेतली. त्यानंतर कुणालने राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचीही भेट घेतली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या भेटीचा फोटो शेअर करत, विथ कुणाल कामरा असं लिहिलं आहे. त्यामुळे आता 'शट अप या कुणाल' या पॉडकास्टमध्ये पुढच्या पाहुण्या सुप्रिया सुळे तर नाहीत ना अशीही चर्चा रंगली आहे.


दोनच दिवसांपूर्वी मुंबईतील खारमधील एका स्टुडिओमध्ये कुणाल कामरा यांनी घेतलेल्या संजय राऊत यांच्या मुलाखतीचं चित्रीकरण पार पडलं. या मुलाखतीत कंगना ते अर्णब आणि सुशांत ते कन्हैय्या या सर्व विषयांवर दिलखुलास गप्पा झाल्या आहेत. इतकंच नाही तर मुलाखतीच्या केंद्रस्थानी बुलडोझर हे प्रॉप होते आणि या बुलडोझरला पद्मश्री का दिला पाहिजे यावरही या मुलाखतीतून खुलासा होणार आहे. त्यामुळे दोघांच्या या मुलाखतीबद्दल नेटकऱ्यांमध्ये चांगलीच उत्सुकता आहे. लवकरच सोशल मीडियावर या मुलाखतीचं प्रक्षेपण होईल.





या मुलाखतीचं चित्रीकरण पार पडल्याच्या दुसऱ्याच दिवशी म्हणजे 12 ऑक्टोबरला कुणाल कामराने खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली. त्यामुळे आता सुप्रिया सुळे आणि कुणाल कामरा यांची भेटही चर्चेचा विषय ठरत आहे. जर कुणाल कामरा सुप्रिया सुळेंची मुलाखत घेणार असेल तर त्यामध्ये कोणते विषय असतील याचीही उत्सुकता आहे.





कुणाल कामराने रमित वर्मासह 2017 मध्ये 'शट अप या कुणाल'ची सुरुवात केली होती. या शोमध्ये एक किंवा त्यापेक्षा जास्त पाहुण्यांना निमंत्रण देऊन त्यांच्याशी संवाद साधला जातो. शिवाय काही बातम्यांचे किंवा डिबेट शोमधील व्हिडीओ क्लिप्स, मजेदार व्हिडीओ दाखवून त्याबाबत काही प्रश्न विचारले जातात. कुणाल कामराच्या या शोमध्ये याआधी एनडीटीव्हीचे रवीश कुमार, गीतकार जावेद अख्तर यांसारखे नामवंत व्यक्ती सहभागी झाले होते.


संबंधित बातम्या


मुलाखतीआधी संजय राऊत आणि कुणाल कामरा यांची भेट!


कुणाल कामरा आणि संजय राऊत यांची 'उखाड दिया' मुलाखत


Sanjay Raut | कुणाल कामरा आणि संजय राऊत यांची 'उखाड दिया' मुलाखत, कामराकडून राऊतांना 'जेसीबी' भेट