मुंबई : मुंबईतील 'एल्फिन्स्टन रोड' स्थानकाचं 'प्रभादेवी' असं झालेलं नामकरण ताजं असतानाच, आणखी एका स्टेशनला देवतेचं नाव देण्याची मागणी होत आहे. हार्बर रेल्वेवरील 'किंग्ज सर्कल' स्टेशनचं नामकरण 'षण्मुख रेल निलायम' करण्याची मागणी 'षण्मुखानंद सभा' या मंदिर ट्रस्टने केली आहे.
'षण्मुखानंद फाईन आर्ट्स अँड संगीत सभे'ने जानेवारी 2017 मध्ये रेल्वे प्रशासनाला पत्र लिहिलं होतं. 'ब्रिटिशकालीन जागा आणि वास्तू यांच्या नावे असलेली रेल्वे स्थानकांची नावं बदलली जात आहेत. अशा स्थानकांना भारतीय नाव देण्याचं भाजप सरकारचं धोरण पाहता आमची मागणी पूर्ण होईल' अशी आशा ट्रस्टचे अध्यक्ष व्ही शंकर यांनी व्यक्त केली आहे.
'किंग्ज सर्कल' स्टेशनचं नामकरण 'षण्मुख रेल निलायम' केल्यानंतर ते देशातील पहिलं थीम-बेस्ड रेल्वे स्थानक व्हावं, असाही आमचा प्रस्ताव आहे. लाईव्ह कॉन्सर्टचा अनुभव, भारतीय वाद्यांची माहिती देणारे देखावे, भित्तीचित्रं रेखाटण्याचा 'षण्मुखानंद फाईन आर्ट्स अँड संगीत सभे'चा मानस आहे.
किंग्ज सर्कलचं नाव 'पार्श्व धाम' करण्याची मागणी शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी गेल्या आठवड्यात लोकसभेत केली होती. या भागात मोठ्या प्रमाणात जैन समुदाय राहत असल्यामुळे पहिल्या जैन तीर्थकरांचं नाव देण्याची मागणी शेवाळेंनी केली होती. मात्र या भागात दाक्षिणात्य आणि कच्छी नागरिक अधिक असल्याचं व्ही शंकर सांगतात.
एलफिन्स्टन रेल्वे स्थानकाचं नाव बदलून प्रभादेवी करण्यासाठी बरेच वर्ष प्रयत्न करण्यात येत होते. अखेर मागील अधिवेशनात केंद्र सरकारने यासाठी हिरवा कंदील दिला. त्यामुळे एलफिन्स्टन स्थानकाचं नाव बदलून बुधवारपासून प्रभादेवी केलं गेलं.
दुसरीकडे, मध्य रेल्वेवरील माटुंगा स्थानकाला तीनशे वर्ष जुन्या मरुबाईचं नाव देण्याची मागणी होत आहे.
प्रभादेवीनंतर 'किंग्ज सर्कल' स्टेशनचं नाव बदलण्याची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Jul 2018 08:37 AM (IST)
हार्बर रेल्वेवरील 'किंग्ज सर्कल' स्टेशनचं नामकरण 'षण्मुख रेल निलायम' करण्याची मागणी 'षण्मुखानंद सभा' या मंदिर ट्रस्टने केली आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -