मुंबई : शिवसेनेने केलेल्या फसवणूकीविरोधात आणि न्याय्य मागण्या मान्य करुन घेण्यासाठी मुंबई महापालिका कर्मचारी संपावर जाण्याच्या तयारीत आहेत. त्याअगोदर पालिका कर्मचाऱ्यांनी संप करावा की करुन नये हे ठरवण्यासाठी 8 ते 16 एप्रिलदरम्यान मतदान होणार आहे. या मतदानानंतर संपावर जाण्याबाबतची भूमिका ठरवली जाणार आहे.


आज परळ येथील मित्रधाम सभागृहात कामगार संघटनांची सभा झाली. या सभेत मुंबई महापालिका कामगारांच्या मागण्यांसाठी नव्या समितीची घोषणा करण्यात आली आहे. 'मुंबई महापालिका कृती समिती' असे या नव्या समितीचे नाव असेल.

मुंबई महानगरपालिका संघटनांच्या 7 फेब्रुवारी 2019 रोजी झालेल्या बैठकीतील निर्णय
1)मुंबई महानगरपालिकेतील सोळा कामगार संघटनांनी स्थापन केली 'मुंबई महानगरपालिका कृती समिती'
2)शिवसेनेने केलेल्या फसवणूकीविरोधात आणि न्याय्य मागण्या मान्य करुन घेण्यासाठी महापालिका कर्मचाऱ्यांनी संप करावा का? यासाठी महापालिका कर्मचारी मतदान करणार आहेत.
3)8 एप्रिल ते 16 एप्रिल 2019 या कालावधीत सर्व आस्थापनांवर मतदान केले जाणार आहे.
4)मतदानाच्या तयारीसाठी 11 फेब्रुवारी पासून द्वारसभा होणार आहे