या मागणीसाठी अमित ठाकरे यांनी वेळोवेळी आवाज उठवला होता. अमित ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वी रेल्वेच्या समस्यांबद्दल चर्चा करण्यासाठी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. त्यावेळी अमित ठाकरेंनी अनेक समस्यांवर चर्चा केली होती. गरोदर महिलांना रेल्वेतून प्रवास करताना दिव्यांगांच्या डब्यातून प्रवास करण्याची परवानगी देण्यात यावी अशी मागणी त्यांनी यावेळी केली होती. त्यानंतर आता रेल्वेने परवानगी दिल्यामुळे गरोदर महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.
अमित ठाकरे यांनी मुंबईच्या समस्यांवर मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेतली होती. या बैठकीत संदिप देशपांडे आणि अमित ठाकरेंनी अधिकाऱ्यांना चांगलचं धारेवर धरलं होतं. आपल्या मागण्यांवर रेल्वे अधिकाऱ्यांची उत्तरं ऐकून अमित राज ठाकरेंनी अधिकाऱ्यांपुढे डोकं टेकलं होतं. अखेर रेल्वे अधिकाऱ्यांकडून अपेक्षित उत्तर अमित ठाकरेंना न मिळाल्याने मनसेच्या मागण्यांचं निवेदन दिलं होतं.
या बैठकीत अमित ठाकरे यांनी मुंबईकरांच्या समस्यांचा पाढाच महाव्यवस्थापकांपुढे वाचला होता. अमित ठाकरे यांनी बैठकीत मुंबईकरांसबंधीत महत्वाचे मुद्दे मांडले होते. यात रेल्वेमध्ये एकही महिला सुरक्षित नसल्याचं अमित ठाकरे यांनी महाव्यवस्थापकांच्या निदर्शनात आणून दिलं होतं. तसेचं फक्त सुरक्षेसाठी सीसीटीव्हीच नाही तर सुरक्षा रक्षकांमध्ये वाढ करण्यात यावी अशी मागणी अमित ठाकरेंनी केली होती.
दर रविवारी मेगा ब्लॉक असतो, पावसाळ्यात सतत ट्रेनची राखडपट्टी होते यावर कायम तोडगा काढण्याची मागणी अमित ठाकरेंनी केली होती. तसेच रेल्वेच्या संख्येत वाढ व्हावी, कारण पहिल्या दर्जाच्या डब्यातही इतकी गर्दी असेल तर त्या पासचा उपयोग काय आहे असा सवाल अमित ठाकरेंनी उपस्थित केला होता.