कळंबोली: आवडीच्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला नाही म्हणून 17 वर्षीय मुलीनं आत्महत्या केल्याची घटना नवी मुंबईत घडली आहे. कळंबोलीतल्या पुष्पा सूर्यवंशी असं मुलीचं नवा आहे.
या विद्यार्थिनीला सुधागड कॉलेजमध्ये अकरावीसाठी प्रवेश घ्यायचा होता. त्यासाठी तिनं 20 हजार रुपये डोनेशनही भरलं होतं. पण, पुष्पाला सुधागडमध्ये ऑनलाईन प्रवेश मिळाला नाही. तसंच तिनं घेतलेलं ऑफलाईन ऍडमिशनही रद्द झालं.
आवडत्या कॉलेज प्रवेश न मिळाल्यानं आणि ऑफलाईन अॅडमिशनही रद्द झाल्याच्या नैराश्येतून तिनं राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली. आवडत्या कॉलेजमध्ये प्रवेश न मिळाल्यानं आत्महत्या करीत असल्याची सुसाईट नोट पुष्पानं लिहून ठेवली होती.