मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर सहाव्या दिवशी खातेवाटप जाहीर झालं आहे. आदित्य ठाकरे यांना खातेवाटपात पर्यावरण आणि पर्यटन मंत्रिपद देण्यात आलं आहे. चांगली लोकं सोबत आहेत, त्यामुळे चांगल काम करू, असा विश्वास आदित्य ठाकरे यांनी खातेवाटपानंतर पहिली प्रतिक्रिया देताना व्यक्त केला.

सरकारचं जे खातेवाटप झालं त्यामध्ये मला पर्यटन, पर्यावरण खातं मिळालं आहे. आवडीची खाती मिळाळी याचा आनंद आहे. या खात्यांवर अर्थव्यवस्था अवलंबून आहे. या विभागात महाराष्ट्रासाठी खुप काम करण्याची संधी आहे. सर्वांच्या सूचनेनुसार काम करीन. सर्वांना सोबत घेऊन महाराष्ट्राचा विकास करु, याची खात्री आहे. महाविकास आघाडीचे सर्व आमदार सोबत आहे. चांगले लोक बरोबर आहेत, त्यामुळे चांगलं काम करता येईल. मित्रपक्षांकडून खुप चांगले सल्ले मिळतील, असं आदित्य ठाकरेंनी म्हटलं.

खातेवाटपाची अधिकृत यादी

उद्धव ठाकरे - मुख्यमंत्री, सामान्य प्रशासन, माहिती तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, विधी व न्याय आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना नेमून न दिलेली खातीअजित पवार - उपमुख्यमंत्री, वित्त, नियोजन

कॅबिनेट मंत्री

सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म, मराठी भाषाअशोक चव्हाण - सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक उपक्रम वगळून)छगन भुजबळ - अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणदिलीप वळसे- पाटील - कामगार, राज्य उत्पादन शुल्कजयंत पाटील - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास नवाब मलिक - अल्पसंख्याक विकास व औकाफ, कौशल्य विकास व उद्योजकता अनिल देशमुख - गृह बाळासाहेब थोरात - महसूलराजेंद्र शिंगणे - अन्न व औषध प्रशासनराजेश टोपे - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याणहसन मुश्रीफ - ग्राम विकास डॉ.नितीन राऊत - उर्जावर्षा गायकवाड - शालेय शिक्षणडॉ.जितेंद्र आव्हाड - गृहनिर्माणएकनाथ शिंदे - नगर विकास, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम)सुनिल केदार - पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय विकास, क्रिडा व युवक कल्याणविजय वडेट्टीवार - इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, खार जमिनी विकास, भुकंप पुनर्वसनअमित देशमुख - वैद्यकीय शिक्षण, सांस्कृतिक कार्यउदय सामंत - उच्च व तंत्र शिक्षणदादाजी भुसे - कृषि, माजी सैनिक कल्याणसंजय राठोड - वने, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन गुलाबराव पाटील - पाणी पुरवठा व स्वच्छता ॲड. के.सी. पाडवी - आदिवासी विकास संदिपानराव भुमरे - रोजगार हमी, फलोत्पादनबाळासाहेब पाटील - सहकार, पणनअनिल परब - परिवहन, संसदीय कार्यअस्लम शेख - वस्त्रोद्योग, मत्स्य व्यवसाय, बंदरे विकासयशोमती ठाकूर - महिला व बालविकासशंकराराव गडाख - मृद व जलसंधारणधनंजन मुंडे - सामाजिक न्याय व विशेष सहाय्य आदित्य ठाकरे - पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार

राज्यमंत्री

अब्दुल सत्तार - महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिनी विकास, विशेष सहाय्यसतेज पाटील - गृह (शहरे), गृहनिर्माण, परिवहन, माहिती तंत्रज्ञान, संसदीय कार्य, माजी सैनिक कल्याणशंभुराज देसाई - गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास व उद्योजकता, पणनबच्चू कडू - जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास, इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्ग कल्याण, कामगारदत्तात्रय भरणे- सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), मृद व जलसंधारण, वने, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय, सामान्य प्रशासनडॉ. विश्वजीत कदम - सहकार, कृषी, सामाजिक न्याय, अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण, अल्पसंख्यांक विकास व औकाफ, मराठी भाषाराजेंद्र पाटील यड्रावकर - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण, वैद्यकीय शिक्षण, अन्न व औषध प्रशासन, वस्त्रोद्योग, सांस्कृतिक कार्यसंजय बनसोडे - पर्यावरण, पाणी पुरवठा व स्वच्छता, सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम), रोजगार हमी, भूकंप पुनर्वसन, संसदीय कार्यप्राजक्त तनपुरे - नगर विकास, उर्जा, आदिवासी विकास, उच्च व तंत्र शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसनआदिती तटकरे - उद्योग, खनिकर्म, पर्यटन, फलोत्पादन, क्रिडा व युवक कल्याण, राजशिष्टाचार, माहिती व जनसंपर्क