Aaditya Thackeray : मेट्रो-6 प्रकल्पासाठी जागा देण्यावरून आदित्य ठाकरे यांनी कांजूरमार्गमधील जागेवरून शिंदे फडणवीस सरकारला घेरताना कडाडून हल्लाबोल केला आहे. कांजूरमार्गमधील ती 15 हेक्टर जागा कोणाची? अशी विचारणा आदित्य ठाकरे यांनी केली आहे. ज्या कांजूरमार्ग जागेवरून वाद झाला त्याच जागेवरून आदित्य ठाकरे यांनी राज्य सरकारवर प्रश्नांची सरबत्ती करताना शिंदे फडणवीस सरकारचा मुंबईवर राग कशासाठी? अशी विचारणा केली. कांजूरमार्गमध्ये इंटिग्रेटेड कारशेड होऊन मुंबईकरांचा वेळ, पैसा वाचला असता, पण खोडा घातल्याचा आरोपही त्यांनी केला. त्यामुळे मेट्रो- 6 ला जागा देण्यावरून वाद पेटण्याची चिन्हे आहेत.
आदित्य ठाकरे म्हणाले की, महसूल विभागाकडून मेट्रो 6 साठी कांजूरमार्गच्या जागेचे जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असताना आपण आरे ऐवजी कांजूरमार्ग या ठिकाणी सांगितलं होतं. चार कार डेपो एकत्र करणार असल्याने साडेचार कोटी जनतेला जोडलं असत आणि त्यामधून 10 हजार कोटी रुपये वाचले असते. आम्ही हे काम हाती घेतल्यानंतर त्यावेळी आरेमधील आदिवासी जनतेला ती जागा राहिली असती. मात्र, महाराष्ट्र भाजप आणि इतर जणांनी कोर्टात गोंधळ घातला. अनेक आंदोलने झाली. आता झाडे कापण्याचा प्रयत्न सुरु असून आणखी झाडे तोडली जाणार आहेत. या घटनाबाह्य सरकारचा एवढा राग का आहे? हे घोटाळे सर्व बाहेर आणणार आहे.
जनेतेचा वेळ, पैसा वाचावा हे आम्ही पाहत होतो. कांजूरमार्ग कारशेड झालं असतं, तर साडे दहा ते साडे दहा हजार कोटी वाचले असते. त्याठिकाणी इंटिग्रेटेड कारशेड झालं असतं. आम्ही आरे कारशेडमधील 800 एकर परिसर जंगल म्हणून घोषित केलं. मुंबईकरांना इंटिग्रेटेड कारशेडपासून वंचित ठेवलं. आता सुप्रीम कोर्टातील केस माघार घेण्यात आली आहे. 44 हेक्टरपैकी 15 हेक्टर जमीन कोणाच्या मालकीची आहे? संबंधितांना भरपाई देणार आहेत की नाही? अशी विचारणा त्यांनी केली.
इतर महत्वाच्या बातम्या