डोंबिवली : शिवसेनेचा प्रत्येकच दसरा मेळावा हा नवीन दिशा देणारा असतो. त्यामुळे यंदाही परंपरा कायम ठेवत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे नवीन दिशा देतील, असं सूचक वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी केलं आहे.
डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदेंनी आयोजित केलेल्या गरब्याला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमात खासदार श्रीकांत शिंदे, महापौर राजेंद्र देवळेकर यांच्यासह खुद्द आदित्य ठाकरेंनीही ठेका धरला.
शिवसेना दसऱ्याला सत्तेतून बाहेर पडण्याची घोषणा करणार, अशी चर्चा आहे. त्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरेंचं हे वक्तव्य महत्त्वाचं आहे. आदित्य ठाकरेंच्या या वक्तव्यानंतर आता राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
दरम्यान सत्तेतून बाहेर पडण्यावरुन शिवसेनेमध्येही दोन गट असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे पक्ष फुटण्याच्या भीतीने शिवसेना सत्तेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेणार नाही, असंही एकीकडे बोललं जात आहे. तर शिवसेना आणि भाजप यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढतच असल्यामुळे शिवसेना सरकारला अडचणीत आणण्यासाठी सत्तेतून बाहेर पडू शकते, असंही बोललं जात आहे.
शिवसेनेचा प्रत्येक दसरा मेळावा नवीन दिशा देणारा असतो : आदित्य ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
25 Sep 2017 11:09 PM (IST)
डोंबिवलीत खासदार श्रीकांत शिंदेंनी आयोजित केलेल्या गरब्याला आदित्य ठाकरेंनी हजेरी लावली होती. त्यावेळी ते बोलत होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -