मुंबई : निकाल रखडल्यामुळे मुंबई विद्यापाठातील विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लागलं आहे. त्यात बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं अजब कारण विद्यापीठाने मुंबई हायकोर्टात दिलं आहे. या सर्व गोष्टींवर युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरेंनी खोचक टीका केली आहे.
“नशीब, डोकलामचा विषय संपला, नाहीतर डोकलाम आणि नॉर्थ कोरियाचं कारण देखील उशीर झाला म्हणून देतील.”, असं ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठावर निशाणा साधला आहे.
विद्यापीठाचा हायकोर्टात हास्यास्पद दावा
मुंबई विद्यापीठाने निकाल रखडल्याप्रकरणी पुन्हा एकदा मुंबई हायकोर्टात अजब कारण दिलं आहे. मुंबईतील पावसावर खापर फोडल्यानंतर आता बकरी ईद आणि गणेशोत्सवामुळे निकाल रखडल्याचं विद्यापीठाने हायकोर्टात सांगितलं.
याआधी सहावेळा मुंबई विद्यापीठाने डेडलाईन पुढे सरकवली आहे. प्रत्येकवेळी काही ना काही कारण देत आपलं हसं करण्यात विद्यापीठ धन्यता मानत आहे. यावेळी 19 सप्टेंबरची डेडलाईन दिली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या या कारभारामुळे विद्यापीठासह राज्याच्या शिक्षणमंत्र्यांवरही सर्व स्तरातून टीका होत आहे. विशेषत: विद्यार्थ्यांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
संबंधित बातमी : ईद-गणेशोत्सवामुळे निकाल रखडला, मुंबई विद्यापीठाचा दावा
नशीब, डोकलाम विषय संपला, नाहीतर मुंबई विद्यापीठ तेही कारण देईल : आदित्य ठाकरे
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Sep 2017 08:03 AM (IST)
“नशीब, डोकलामचा विषय संपला, नाहीतर डोकलाम आणि नॉर्थ कोरियाचं कारण देखील उशीर झाला म्हणून देतील.”, असं ट्वीट करत आदित्य ठाकरेंनी मुंबई विद्यापीठावर निशाणा साधला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -