मुंबई : अभिनेत्री पारुल यादवला काल जोगेश्वरी परिसरात कुत्रा चावल्याची घटना घडली. पारुलला उपचारासाठी कोकिलाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
जोगेश्वरीतील अपार्टमेन्टमध्ये राहणारी पारुल यादव काल रात्री आपल्या कुत्र्यासह बाहेर पडली होती. यावेळी 6 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला चढवला. या हल्ल्यात तिच्या चेहऱ्यावर, पायांवर आणि मानेवर जखमा झाल्या आहेत.
पारुल आपल्या पाळीव कुत्र्याला फिरायला घेऊन गेली असताना रस्त्यावरील भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. त्यावेळी पारुल तिच्या पाळीव कुत्र्याला वाचवण्यासाठी धावली आणि त्यावेळी भटक्या कुत्र्यांनी पारुलवरच हल्ला केला. पाच ते सहा कुत्र्यांच्या हल्ल्यात पारुल जखमी झाली.
गेल्यावर्षी आलेल्या किलिंग विरप्पन या चित्रपटाच्या माध्यमातून पारुलने हिंदी आणि तेलुगू चित्रपटांमध्ये कामाला सुरुवात केली आहे. बहुचर्चित 'क्वीन' या चित्रपटाच्या कन्नड रिमेकची ती सध्या तयारी करत होती.