सोलापुरातील इव्होन लाईफ सायन्सेस कंपनीच्या आवारात अडीच हजार कोटीच्या अंमली पदार्थाप्रकरणी अनेकांना अटक झाली. मात्र अद्याप विकी गोस्वामी आणि ममता कुलकर्णी पोलिसांच्या हाती लागले नाहीत.
दरम्यान, ठाणे पोलिसांना या प्रकरणात ३० दिवसात अहवाल कोर्टात सादर करावा लागणार आहे. त्यानंतर दोन्ही आरोपींना भारतात आणण्यासाठी रेडकॉर्नर नोटीस काढण्यात येईल. न्यायालय आरोपींच्या भारतात असलेल्या स्थावर मालमत्ता जप्तीचे अधिकार ठाणे पोलिसांना देतील अशी माहिती विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनी दिली.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
एप्रिल आणि मे महिन्यात ठाणे पोलिसांनी 2000 कोटी रुपयांच्या आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला होता. या प्रकरणी अभिनेत्री ममता कुलकर्णीचा पती विकी गोस्वामीचं नाव समोर आलं होतं. विकी गोस्वामी सध्या केनियामध्ये आहे.
कल्याणमध्ये 12 एप्रिल रोजी पहिल्यांदा एका नायजेरियन ड्रग डिलरला अटक करण्यात आली होती. नायजेरियन डिलरच्या माहितीनुसार, ठाण्यातून 2 तरुणांना अटक करण्यात आली. या दोन्ही तरुणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे पुण्यातून मयूर स्वामी नावाच्या फॅक्टरी मॅनेजरच्या मुसक्या आवळल्या. या सगळ्यांच्या माहितीनंतर सोलापूरच्या एव्हॉन लाईफ सायन्स ऑरगॅनिक कंपनीवर छापा मारण्यात आला. या कंपनीतून 2000 कोटी रुपये किंमतीचं एफिड्रिन ड्रग्ज सापडलं.
या रॅकेटमध्ये आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. अजूनही अनेक आरोपी फरार असून याचा मास्टरमाईंड ममता कुलकर्णीचा पती आणि आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेट किंग विकी गोस्वामी आहे. आता ममता कुलकर्णीविरोधातही पोलिसांना महत्त्वाचे पुरावे सापडले आहेत.
संबंधित बातम्या:
ममता कुलकर्णी ड्रग्ज रॅकेटमध्ये, ठाणे पोलिसांकडून शिक्कामोर्तब !
ABP EXCLUSIVE : मी लग्नही केलं नाही आणि 12 वर्ष शारीरिक संबंधही ठेवले नाही- ममता कुलकर्णी