मुंबई : नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB)चे अधिकारी असल्याचे सांगून एका भोजपुरी अभिनेत्रीला खंडणी आणि धमकावल्याप्रकरणी मुंबईच्या ओशिवरा पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. हे दोन्ही नकली अधिकारी असल्याचे पोलीस चौकशीत उघड झाले आहे. या दोन्ही नकली आरोपींच्या खंडणीच्या दबावाखाली येऊन या भोजपुरी अभिनेत्रीने आत्महत्या केली आहे.


सूरज परदेशी आणि प्रवीण वळिंबे अशी या आरोपींची  नाव आहेत. या दोन्ही आरोपींनी 28 वर्षीय भोजपुरी अभिनेत्रीला एका पार्टीत पकडलं होते आम्ही  NCB चे अधिकारी असल्याच यांनी सांगितलं  होत. या अभिनेत्रीकडे हे प्रकरण मिटवण्यासाठी 40 लाखांची मागणी केली होती. नंतर हे प्रकरण 20 लाखांवर मिटले होते. या भोजपुरी अभिनेत्रीसोबत अझीम काझी आणि अन्य 1 तरुण होता आणि तिघेही एका हुक्का पार्लरमध्ये पार्टी करत होते. तिथे हे दोघे आरोपी, स्वतःला NCB अधिकारी म्हणून पोहोचले होते. काझी नावाचा एक व्यक्ती आणि आणखी एक तरुण या दोन आरोपींना भेटत होते आणि या अभिनेत्रीला गोवण्याचा कट चौघांनी रचला होता. ही अभिनेत्री इतकी नैराश्यात गेली की, तिने 23 डिसेंबरच्या रात्री जोगेश्वरी येथील तिच्या भाड्याच्या फ्लॅटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनी आयपीसी कलम 306 दाखल केली आहे.


या 2 आरोपींना (आत्महत्येला प्रवृत्त करणे), 170 (लोकसेवक व्यक्ती म्हणून), 420 (फसवणूक), 384, 388 आणि 389 (खंडणी), 506 (गुन्हेगारी धमकी), 120 ब (गुन्हेगारी कट) अन्वये अटक करण्यात केली आहे, तर अन्य 2 जण फरार झाले आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत असल्याची माहिती जोन 9 या विभागाचे  पोलीस आयुक्त मंजुनाथ शिंगे यांनी दिली आहे.


महत्त्वाच्या बातम्या:



  • Mann ki Baat : कोरोनाच्या नव्या व्हेरियंटवर रिसर्च सुरु, पंतप्रधान मोदींची माहिती

  • ट्रक अंगावर घालून जीवे मारण्याचा प्रयत्न, कटात जयंत पाटलांसह एसपीही सहभागी; पडळकरांचा आरोप