अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण; मुंबईतील नाटकाचे प्रयोग रद्द

प्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांना कोरोनाची लागण झाली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून त्यांनी ही माहिती दिली आहे.

Continues below advertisement

मुंबई : प्रसिद्ध अभिनेते आणि नाट्य निर्माते प्रशांत दामले यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून प्रशांत दामले यांनी ही माहिती दिली. याचमुळे मुंबईत होणाऱ्या एका लग्नाची पुढची गोष्ट या नाटकाचा रिओपनिंगचा प्रयोग रद्द करण्यात आला आहे. यासोबत 61 वर्षीय प्रशांत दामले यांना डॉक्टरांनी किमान सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.

Continues below advertisement

लॉकडाउननंतर पहिल्यांदाच 'एका लग्नाची पुढची गोष्ट' या प्रशांत दामले यांच्या नाटकाचा प्रयोग 12 डिसेंबरला पुण्यात झाला होता. पुण्याचा प्रयोग संपल्यानंतर मुंबईत आल्यावर त्यांना थोडीशी कणकण जाणवत होती. यानंतर त्यांनी कोरोना चाचणी केली असता. त्यांचा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. यानंतर डॉक्टरांनी त्यांना सात दिवस आयसोलेशनमध्ये राहण्याचा सल्ला दिला आहे.

फेसबुकवर प्रशांत दामले यांनी एक व्हिडिओ शेअर करून यासंबंधीची सविस्तर माहिती दिली. बुधवारपासून आयसोलेशनमध्ये असल्यामुळे बोरिवली आणि गडकरी नाट्यगृहात होणारे प्रयोग रद्द करावे लागणार आहे. प्रशांत दामले यांच्यासोबत काम करणारे सह-कलाकार ठणठणीत असल्याचंही दामले यांनी सांगितलं आहे.

Continues below advertisement
Sponsored Links by Taboola