मुंबई : प्लास्टिक बंदीनंतर ग्राहकांना फसवून पर्यावरणपूरक वस्तूंच्या नावाखाली प्लास्टिकची विक्री केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्ड या कंपन्यांवर आता कारवाई करणार आहे. यामध्ये एकूण 12 कंपन्यांचा समावेश आहे.
खोट्या प्रमाणपत्राच्या आधारे पर्यावरणपूरक वस्तूंच्या नावाखाली प्लास्टिकचीच सर्रास विक्री सुरु असल्याचं समोर आलं आहे. प्लास्टिक बंदीनंतर काही कंपन्यांनी पर्यावरणपूरक विघटनशील पिशव्यांची निर्मिती करायला सुरुवात केली. मात्र या पिशव्यांची निर्मिती करताना प्लास्टिकचेच घटक वापरले गेले आणि पिशव्या पर्यावरणपूरक विकल्या गेल्या.
या पिशव्यांची निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडे आवश्यक प्रमाणपत्र नसल्याचं समोर आलं आहे. सेंट्रल पोल्युशन कंट्रोल बोर्डने अशा 12 कंपन्यांवर कारवाई करणार आहे. संबंधित कंपन्यांबाबत एटीआर दाखल करण्याचे आदेश सेंट्रल पोल्युशन बोर्डाने दिले आहेत.
या कंपन्यावर होणार कारवाई?
- मे. अॅडव्हान्स बायोमटेरिअल कंपनी, मुंबई
- मे. अॅडसम सोल्युशन प्रा.लि. अहमदाबाद
- मे. श्रीराम बायोप्लास्टिक, कानपूर, उत्तर प्रदेश
- मे. एनी पॅकेजिंग. ग्रेटर नोएडा, उत्तर प्रदेश
- मे. सिंफनी पॉलिमर्स, दिल्ली
- मे. बायोटेक बॅग्ज, चैन्नई
- मे.बायोग्रीन, बँगलोर
- मे. युनिग्रीन, अहमदाबाद
- मे. क्लीन अॅड ग्रीन पॉलीबॅग्ज, चेन्नई
- मे. ट्रिनिटी. प्लास टेक, चेन्न्ई
- मे. भवानी प्लास्टिक्स, चेन्नई
- मे. एन्व्हीग्रीन. बँगलोर