Accident : मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनीनजिक एसटी आणि कारचा अपघात झाला आहे. या अपघातात अहमदनगरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संग्राम जगताप थोडक्यात बचावले आहे. संग्राम जगताप यांच्या कारचा चक्काचूर झाला आहे. पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. आमदार जगताप हे मुंबईकडे येत असताना हा अपघात झाला. 


अपघात झाला असून मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर बीएमडब्ल्यू कार आणि एसटी बसचा अपघात झाल्याची माहिती मिळत आहे. रसायनी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली ही घटना आहे. सुदैवानं या अपघातात कुणीही जखमी झालेलं नाही. पहाटे 5.30 वाजताच्या दरम्यान ही घटना घडली. 


आमदार संग्राम जगताप हे आपल्या मर्सिडिज कारमधून मुंबईच्या दिशेने येत होते. त्यावेळी हा अपघात झाला. एसटी बससोबत झालेली ही धडक अतिशय भीषण होती. यामध्ये आमदार संग्राम जगताप यांच्या आलिशान कारचा चक्काचूर झाला. कारमधील एअरबँगही उघडल्या.  सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नाही. या अपघातानंतर महामार्गावर वाहतूक कोंडी झाली होती.  या अपघाताचे नेमकं कारण स्पष्ट झाले नाही. मात्र, कार चालकाने नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला असावा अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. 


पाहा व्हिडिओ: चारही Airbags उघडल्याने संग्राम जगताप सुखरुप, BMW car चक्काचूर



धुळ्यातील अपघातात तीन ठार


मुंबई -आग्रा राष्ट्रीय महामार्गावर रात्री १२ च्या सुमारास भीषण अपघात झालाय. मालेगाववरून कांदा घेऊन मध्य प्रदेशला जाणाऱ्या भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने समोरून येणाऱ्या अॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली.  या अपघातात क्रुझर आणि रिक्षाचा देखील चक्काचूर झाला. हा अपघात इतका भीषण होता की या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर नऊ जण गंभीर जखमी झाले. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत. जखमी झालेले पारोळा तालुक्यातील तरडी गावातील रहिवासी असल्याचं सांगितलं जातंय