नवी मुंबई : नवी मुंबईतील सीबीडीमध्ये राहणाऱ्या 23 वर्षीय सर्पमित्राचा सापाच्या दंशानं मृत्यू झाला आहे. सोमनाथ म्हात्रे असं या सर्पमित्राचं नाव असून गेल्या काही महिन्यांपासून तो साप पकडायला लागला होता. सीबीडीमधील उद्यानात निघालेला कोब्रा पकडताना त्याच्या पोटात दंश केल्याने सोमनाथ म्हात्रे याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
2 तारखेला सीबीडी उद्यानात निघालेला चार फूटाचा नाग पडण्यासाठी पकडण्यासाठी बोलावण आलं असता सोमनाथ हा नाग पकडण्यासाठी गेला होता. सोमनाथ म्हात्रे या सर्पमित्रानं साप पकडण्यासाठी प्रयत्न केला. तिथे जमलेल्या लोकांच्या हालचालींवरुन तो साप चिडल्याचे लोकांच्या लक्षात आले होते. पण सोमनाथनं नागाला पकडून घरी आणलं. कुटूंबाला दाखविण्यासाठी तो पोत्यातून कोब्रा बाहेर काढत हातात घेतला. मात्र या वेळेस खवळलेल्या सापाने आपला डाव साधत सोमनाथच्या पोटाचा चावा घेतला.
हातात पकडलेल्या सापाने मागे फिरत सोमनाथ याच्या पोटावर बेंबीवर दंश केल्यानं त्याचं विष सोमनाथच्या अंगात पसरण्यास सुरवात झाली. सापाने दंश केल्यानंतर सोमनाथ म्हात्रे याला प्रथम सीबीडीमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यानंतर वाशीच्या पालिका रुग्णालयात उपचार सुरु असताना चार दिवसांनी त्याचा मृत्यू झाला.