रस्त्याशेजारी उभ्या असलेल्या दुचाकीस्वाराला भरधाव बसनं चिरडलं
एबीपी माझा वेब टीम | 16 Apr 2016 02:13 AM (IST)
मुंबई: काल रात्री वांद्रेतील बीकेसीमध्ये झालेल्या अपघातात एका ४७ वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. गिरधरभाई मुलानी हे आपल्या दुचाकीवर थांबले होते. यावेळी भरधाव वेगात आलेल्या एका बसने या दुचाकीला धडक दिली. दुचाकीवर असलेले मुलानी यांचा पाय या अपघातात बसच्या चाकाखाली आला आणि ते बससोबत जवळपास २५-३० फूट फरफटत गेले. डोक्याला गंभीर जखम झालेल्या मुलांनी यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. दरम्यान, बसचालकाला पोलिसांनी अटक केली असून आरोपीवर रँश ड्रायव्हिंगचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.