मुंबई : मुंबईतल्या पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाही आणि एसी लोकल प्रवाशांच्या चर्चेचा विषय़ ठरली. या घटनेमुळे लोकलमधून उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल झाले.
सोमवारी सकाळी 8 वाजून 45 मिनिटांनी चर्चगेटहून सुटलेल्या एसी लोकलमध्ये ही घटना घडली. लोकल दादर स्थानकावर पोहोचल्यानंतर लोकलच्या दुसऱ्या क्रमांकाच्या डब्याचे दरवाजे उघडले नाहीत. दरवाजे उघडण्याची पूर्वसूचना देणारी यंत्रणा लोकलमध्ये असते. दरवाजे उघडतील या आशेत अनेक प्रवासी वाट पाहात होते. मात्र, दरवाजे न उघडल्याने प्रवाशांना प्रवास करता आला नाही.
दरवाजे न उघडताच लोकल पुढे रवाना झाल्याने ज्या प्रवाशांना दादरला उतरायचे होते त्यांना नाईलाजास्तव वांद्रे स्थावकावर उतरावे लागले. तेथून त्यांना पुन्हा वांद्रे स्थानकावरुन परत दादरच्या दिशेने प्रवास करावा लागला. रेल्वेच्या या गोंधळात प्रवाशांना नाहक त्राक सहन करावा लागला.
Election Results 2024
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
म्हणून एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाहीत...
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
17 Jul 2018 08:14 AM (IST)
मुंबईतल्या पश्चिम रेल्वेच्या दादर स्थानकात एसी लोकलचे दरवाजे उघडलेच नाही आणि एसी लोकल प्रवाशांच्या चर्चेचा विषय़ ठरली. या घटनेमुळे लोकलमधून उतरणाऱ्या आणि चढणाऱ्या प्रवाशांचे खूप हाल झाले.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -