अक्षय भाटकर, एबीपी माझा, मुंबई | 25 Mar 2017 01:14 PM (IST)
मुंबई: मुंबईकरांचा गारेगार प्रवास आता नजरेच्या टप्प्यात आहे. कारण पहिल्यांदाच एसी लोकल रुळावरुन धावली आहे. एसी लोकलची चाचणी ठाणे ते टिटवाळा या मार्गावर घेण्यात आली. या चाचणीमुळे घामाच्या धारांनी हैराण होणाऱ्या मुंबईकरांना गारेगार प्रवास अनुभवता येणार आहे. वर्षभरापूर्वी एसी लोकल मुंबईत दाखल झाली आहे. तीची यापूर्वीही चाचणी घेण्यात आली होती. सुमारे 55 कोटी खर्चून तयार झालेली ही लोकल वर्षभरापूर्वी कुर्ला कारशेडमध्ये पोहोचली होती. मात्र सॉफ्टवेअरमध्ये येत असलेले अडथळे आणि जास्त उंची यामुळे ही लोकल कारशेडमध्येच उभी राहिली. सुरुवातीला पश्चिम रेल्वेवर ही एसी लोकल धावणार होती. मात्र, रेल्वे मंत्रालयाने या लोकलला मध्य रेल्वेमार्गावर आणण्याचा निर्णय घेतला. मात्र आता पुन्हा या निर्णयात बदल करुन ती पश्चिम रेल्वेवरच धावेल, असं सांगण्यात येत आहे. नव्या एसी लोकलची वैशिष्ट्ये: 1. आधुनिक सुविधांची देशातली पहिली 12 डब्यांची एसी लोकल 2. या लोकलमधील 6-6 डबे आतून एकमेकांना गँगवेमार्फत जोडलेले असणार 3. डब्यांना ऑटोमॅटिक दरवाजे 4. प्लॅटफॉर्मवर जेव्हा लोकल येईल, तेव्हा मोटरमनच्या हातात दरवाजे उघडणे, बंद करण्याचे नियंत्रण 5. अडचणीच्या वेळी प्रवाशांना एका नॉबच्या सहाय्यानं दरवाजे उघडता येणार 6. स्टीलपासून बनवलेले वातानुकुलित कोच स्टील ग्रे आणि इंडीगो रंगात 7. प्रत्येक कोचमध्ये मोठ्या खिडक्या 8. सुरक्षेच्या दृष्टीनं खिडक्यांच्या काचा आणि दरवाजांमध्ये विशेष रचना 9. डब्यात सीट्स अत्यंत आरामदायी असतील 10. दोन सीटच्या अंतरात वाढ, गर्दीत उभं राहून प्रवाशांना प्रवास शक्य 11. नव्या पद्धतीचे हँडल आणि दरवाजातील खांब 12. एका डब्यात सुमारे 400 प्रवासी 13. 12 डब्यात 5 हजार प्रवासी प्रवास करु शकणार 14. मोटरमनशी बोलण्यासाठी टॉक बॅक मशिनची सुविधा 15. एसी लोकलच्या प्रत्येक डब्यात 15 टनांचे दोन एसी संबंधित बातम्या