मुंबई: 'मुंबईच्या विकासासाठी आम्ही विरोधात बसू, पण शिवसेना भाजपबरोबर जाणार नाही.' असं समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींनी म्हटलं आहे. 'आमचे आणि त्यांचे विचार वेगळे आहेत. काँग्रेस जर या दोघांचा विचार करत असेल तर ती दुर्दैवाची बाब आहे.' असं म्हणत आझमींनी काँग्रेसवरही निशाणा साधला.


मुंबईवर सत्ता प्रस्थापित करण्यासाठी शिवसेना भाजपकडून जोरदार चर्चा खलबतं सुरु झाली आहेत. मॅजिक फिगर गाठण्यासाठी अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांची चाचपणी सुरु असून सेनेला 4 अपक्षांनी साथ दिली आहे. मुंबईत सहा जागा मिळवणाऱ्या समाजवादी पक्षानं मात्र शिवसेना किंवा भाजपसोबत जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे.

दुसरीकडे काँग्रेसनं मात्र, आपली भूमिका अजूनही स्पष्ट केलेली नाही. पण जोवर शिवसेना राज्यातील सत्ता सोडत नाही तोवर आपण शिवसेनेला पाठिंबा देणार नाही. असंही काँग्रेसकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

मुंबई महापालिकेत कुणाही एका पक्षाला सत्ता मिळाली नसल्यामुळे सत्तेचं त्रांगडं झालं आहे. त्यामुळे शिवसेना आणि भाजपकडून सत्तेसाठी जोरदार प्रयत्न सुरु झाले आहेत.

संबंधित बातम्या:

युती होणार का? आशिष शेलार म्हणतात…

राज ठाकरेंच्या ‘सात’ची ‘साथ’ शिवसेनेला की भाजपला?

तिसरा अपक्ष नगरसेवक शिवसेनेच्या गळाला, संख्याबळ 87

युतीबाबत अजून विचार केलेला नाही, उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण