लोकलमधील स्टंटबाजामुळे 'माझा'च्या प्रतिनिधीना दुखापत
एबीपी माझा वेब टीम | 21 Jun 2017 11:21 PM (IST)
मुंबई : मुंबईच्या लोकलमध्ये स्टंटबाजी करणाऱ्यांमुळे अनेकदा प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. 'एबीपी माझा'चे कॅमेरामन विनय राजभर यांनाही छायाचित्रण करताना अशा स्टंटबाजामुळे दुखापत झाली. हा प्रकार 'माझा'च्या कॅमेरात कैद झाला आहे. ठाणे- मुलुंडदरम्यान नव्यानं बनवण्यात येणाऱ्या रेल्वे स्टेशनबाबत वृत्तांकन करत असताना 'माझा'च्या प्रतिनिधींना अशाच एका स्टंटबाजाचा सामना करावा लागला. शेजारुन जाणाऱ्या ट्रेनमधून एक पिशवी दोघांच्या दिशेने भिरकवण्यात आली. ही पिशवी लागून 'माझा'चे कॅमेरामन विनय राजभर यांच्या डोळ्याला दुखापत झाली. त्यांच्यावर दवाखान्यात उपचार करण्यात आले. अक्षय भाटकर यातून थोडक्यात बचावले.