एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 03/04/2018

  1. सीबीएसई दहावी गणिताची फेरपरीक्षा होणार नाही, देशभरातील 16 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना दिलासा, बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरबाबत मात्र अद्याप घोषणा नाही https://goo.gl/vXa3cb


 

  1. अॅट्रॉसिटीबाबतच्या निर्णयाला स्थगिती नाही, केंद्र सरकारच्या फेरविचार याचिकेवर सुप्रीम कोर्टाचा निर्णय, पक्षकारांना तीन दिवसात बाजू मांडण्याचे आदेश https://goo.gl/r9dFEB


 

  1. फेक न्यूजवरील कारवाईचा फतवा अवघ्या 16 तासात मागे, देशभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर पंतप्रधान कार्यालयाचा निर्णय, स्मृती इराणींना जोर का झटका https://goo.gl/nGNZgn


 

  1. महाराष्ट्रात रस्ते बांधणी आणि डांबरीकरणात 23 हजार कोटींचा रस्ते घोटाळा, रत्नागिरीच्या बड्या कॉन्ट्रॅक्टरचा आरोप, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिवांकडे बोट https://goo.gl/pv6KzW


 

  1. घरात घुसलेल्या बिबट्याला झुंज देणारी भंडाऱ्याची वाघीण, मायलेकीच्या रौद्ररुपासमोर बिबट्याची माघार, रुपाली मेश्रामच्या धाडसाचं महाराष्ट्रभरातून कौतुक https://gl/MP46fJ


 

  1. कारमध्ये खेळताना गाडी लॉक झाल्यानं गुदमरुन मुलाचा मृत्यू, चाकणमधली घटना, भर उन्हात उभ्या असलेल्या गाडीत चिमुरडा होरपळला https://goo.gl/mMW15P


 

  1. पत्नीला अंधारात ठेवून अविवाहित असल्याचं खोटं प्रतिज्ञापत्र, दोन मुली असताना मुंबईतील ‘जसलोक’मध्ये सरोगसीने पुत्रप्राप्ती करण्याचा पित्याचा प्रयत्न, बालहक्क आयोगाकडून गुन्हा दाखल करण्याचे आदेश https://goo.gl/yfmMGi


 

  1. पत्नीशी संमतीविना ठेवलेले शारीरिक संबंध बलात्कार नाही, मात्र अनैसर्गिक शरीरसंबंध क्रौर्यच, गुजरात हायकोर्टाचा निर्वाळा https://goo.gl/dHTzqP


 

  1. रायगडमधील माथेरानमध्ये गर्भवती पत्नीला 800 फूट खोल दरीत ढकललं, गिर्यारोहकांच्या मदतीने पोलिसांनी महिलेला वाचवलं, पती सुरेश पवार अटकेत https://goo.gl/KkcvzH


 

  1. ठाण्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याच्या मुलाचा विनयभंग, मुंबईतील पोलिस कॉन्स्टेबल प्रमोद ठोंबरे अटकेत, मुलुंड पोलिसांची कारवाई https://goo.gl/vRr3Lz


 

  1. नवनिर्वाचित राज्यसभा खासदारांचा शपथविधी सोहळा संपन्न, नारायण राणेंची हिंदीत, तर कुमार केतकरांची इंग्रजीत शपथ https://goo.gl/UT1KnR


 

  1. 'मराठी बिग बॉस'च्या घरातील संभाव्य स्पर्धकांची नावं एबीपी माझाच्या हाती, अभिनेत्री उषा नाडकर्णी, सुशांत शेलार यांची नावं चर्चेत https://goo.gl/SdhS5T


 

  1. 'धकधक गर्ल' माधुरी दीक्षितच्या पहिल्या-वहिल्या मराठी सिनेमाच्या रीलीजचा मुहूर्त ठरला, 'बकेट लिस्ट' 25 मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला https://goo.gl/scEFZ8


 

  1. ‘गावाकडच्या गोष्टी’ वेब सीरीजचे कलाकार ‘कृष्णकुंज’वर, एबीपी माझाने दाखवलेल्या ‘केळेवाडी टू जोहान्सबर्ग’ बातमीची मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून दखल https://goo.gl/d5rmvH


 

  1. जोहान्सबर्ग कसोटीत आफ्रिकेचा मोठा विजय, ऑस्ट्रेलियावर तब्बल 492 धावांनी मात, 1970 नंतर आफ्रिकेने मायदेशात कांगारुंविरोधात मालिका जिंकली https://goo.gl/uukBYi


 

माझा विशेष : फेक न्यूज फक्त निमित्त, हेतू मीडियाला दाबण्याचा? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive  

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा