एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 02/07/2018


1.    पृथ्वीराज चव्हाणांचा मुख्यमंत्र्यांवर जमीन घोटाळ्याचा आरोप, नवी मुंबईतील सिडकोची 1767 कोटींची जमीन अवघ्या 3 कोटीत बिल्डरला दिल्याचा दावा, आमदार प्रसाद लाडही आरोपीच्या पिंजऱ्यात https://goo.gl/Uajjhz

2.    नितीन गडकरींविरोधात शड्डू ठोकण्याची नाना पटोलेंची तयारी, पक्षाने आदेश दिला तर नागपूरमधून लोकसभा निवडणूक लढवणार https://goo.gl/dgWuj3

3.    धुळ्यातील आरोपींना कठोर शिक्षा देणार, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन, नातेवाईकांना 5 लाखांच्या मदतीची घोषणा, नातेवाईकांनी मृतदेह स्वीकारले https://goo.gl/WRDtYV

4.    मुलं पळवणारी टोळी समजून मालेगावातही चार जणांना मारहाण, अकबर हॉस्पिटलच्या परिसरातील घटना, शहरात तणावाचं वातावरण https://goo.gl/gMyCqd

5.    मल्टीप्लेक्समधील मारहाणीविरोधात पोलिसांत जा, मनसेच्या आंदोलनाविरोधात थिएटर मालकांना दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाचा नकार https://goo.gl/eVMoaZ

6.    नाशिकमधील सप्तश्रुंगी गडावर देशातील पहिली फ्युनिक्यूलर ट्रॉली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळांच्या हस्ते लोकार्पण, भाविकांचा मंदिरापर्यंतचा प्रवास सुलभ होणार https://goo.gl/s4Z32W

7.    शेतकऱ्यांच्या हितासाठी दुष्काळाबाबतची नवी नियमावली जाहीर, पेरणीच्या सरासरी तुलनेत 15 टक्के घट झाल्यास तातडीने दुष्काळ जाहीर करणार https://goo.gl/VEkCwQ

8.    मुख्यमंत्र्यांच्याच कार्यक्रमात प्लॅस्टिकबंदीचे नियम धाब्यावर, कल्याणमधील वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात पाण्यासाठी प्लॅस्टिकचे ग्लास https://goo.gl/xxVYt1

9.    एक दिवस शेतकऱ्यांसोबत, अकोल्याचे पालकमंत्री डॉ. रणजीत पाटील यांच्यासह अख्खं जिल्हा प्रशासन दिवसभर बांधावर https://goo.gl/WZiokJ

10.    पुण्यात पीएमपीएमएलची बस पुलावरुन ओढ्यात कोसळली, वारजे-कात्रज बाह्यवळण रस्त्यावरची घटना, 10 प्रवासी गंभीर जखमी https://goo.gl/p98WSA

11.    मुंबईमधील काळाचौकीत जमीन खचून घरात 20 फुटांचा खड्डा, आठवड्याभरातील दुसरी दुर्घटना https://goo.gl/AFKLjq

12.    दिल्लीतील एकाच घरात 11 मृतदेह आढळल्याचं प्रकरण, मोक्षप्राप्तीसाठी आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय, संशयित जनेगदी बाबाचा शोध सुरु https://goo.gl/KKxykS

13.    'द वॉल'चा आयसीसीच्या 'हॉल ऑफ फेम'मध्ये समावेश, राहुल द्रविड हा सन्मान मिळवणारा पाचवा भारतीय खेळाडू https://goo.gl/cqCgg9

14.    गायक अंकित तिवारीच्या वडिलांना मारहाण केल्याचा आरोप, माजी क्रिकेटर विनोद कांबळी आणि पत्नीविरोधात तक्रार, तर आरके तिवारींनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा अँड्रियाचा दावा https://goo.gl/4iY4xi

15.    'संजू' सिनेमातून देशद्रोही आणि व्यसनाधीन तरुणाचं आयुष्य ग्लोरिफाय, 'संजू'ची दुसरी बाजूही दाखवायला हवी, अभिनेते योगेश सोमण यांची जोरदार टीका https://goo.gl/9LJJvs 'संजू'ने इतिहास रचला, रविवारी 'बाहुबली 2' चाही विक्रम मोडला https://goo.gl/t374Gr

VIDEO : ‘बिग बॉस’मधून बाहेर पडलेल्या अभिनेत्री उषा नाडकर्णींची एक्स्क्लुझिव्ह मुलाखत https://goo.gl/spnciT

VIDEO : बिहारमधल्या 'किसान चाचीची गोष्ट'

BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा ‘रेड लाईट डायरीज’ सीरिजमधील नवा ब्लॉग - 'मुजऱ्याच्या पाऊलखुणा' https://goo.gl/bb2uSK

माझा विशेष : नागपूरची बोकड निर्यातबंदी : जैन समाजाच्या आग्रहासाठी इतरांच्या पोटावर पाय का? पाहा विशेष चर्चा रात्री 9 वाजता फक्त एबीपी माझावर

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive   

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - www.instagram.com/abpmajhatv

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा