एबीपी माझाचं व्हॉट्सअप बुलेटीन 25/02/2018

1.    बॉलिवूडच्या ‘चांदणी’ची चटका लावून जाणारी अकाली एक्झिट, वयाच्या 54 व्या वर्षी प्रसिद्ध अभिनेत्री श्रीदेवी यांचं निधन, कार्डिअॅक अरेस्टने दुबईत घेतला अखेरचा श्वास https://goo.gl/XHVQHx

2.    अष्टपैलू अभिनेत्री श्रीदेवी गेल्याने सिनेसृष्टीसह देशभरात हळहळ, दुबईत शवविच्छेदन झाल्यानंतर श्रीदेवींचं पार्थिव मुंबईत आणणार, उद्या अंत्यसंस्कार https://goo.gl/sHGA77

3.    लेकीची बॉलिवूडमधली 'धडक' पाहण्यापूर्वी 'मॉम'ची एक्झिट, जान्हवी कपूरच्या डेब्युबाबत उत्सुक असणाऱ्या श्रीदेवींना मृत्यूनं गाठलं https://goo.gl/RfN98K

4.    यूपीए सरकारकडून श्रीदेवींचा ‘पद्म’ने गौरव, श्रद्धांजली वाहताना काँग्रेसकडून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रकार, टीकेनंतर ट्वीट डिलिट https://goo.gl/pzxVHM

5.    अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर विरोधकांची बैठक, उद्यापासून राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन, सरकारच्या चहापानावर विरोधकांचा बहिष्कार https://goo.gl/Sp94fL

6.    येत्या वर्षापासून शालेय अभ्यासक्रम निम्मा, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकरांची माहिती, अभ्यासक्रमाचा बोजा कमी करण्याचा निर्णय https://goo.gl/4jMqC8

7.    राज्यातील सर्व एसटी बसस्थानकात ‘मराठी वाचन सप्ताह’, मराठी भाषा दिनानिमित्त 27 फेब्रुवारीपासून 5 मार्चपर्यंत आयोजन, परिवहन मंत्री दिवाकर रावतेंची घोषणा https://goo.gl/7q5vsn

8.    पक्षातून हकालपट्टीचं मीडियातून कळलं, काँग्रेस सोडणार नाही, माजी मंत्री सतिश चतुर्वेदींची प्रतिक्रिया, तर चतुर्वेदींच्या हकालपट्टीनंतर नागपुरात काँग्रेस कार्यकर्त्यांचा जल्लोष https://goo.gl/ogFMLJ

9.    उत्तर प्रदेशातील मेरठमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं जोरदार शक्तिप्रदर्शन, राष्ट्रोदय संमेलनानिमित्त तीन लाखांहून अधिक स्वयंसेवक उपस्थित, संघाचा दावा https://goo.gl/XySgea

10.    शिर्डीत अल्पवयीन तरुणीवर पिता-पुत्राचा अत्याचार, आरोपी मुलगा पसार, तर पित्याला बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश https://goo.gl/nbnE9n

11.    नागपुरात पशुवैद्यकीय डॉक्टरवर मृत वाघाचे अवयव तस्करीचा आरोप, वनविभागाकडून तपास सुरु, डॉक्टरनं आरोप फेटाळले https://goo.gl/MUX3Ly

12.    सिंधुदुर्गात पुन्हा वणवा, बांद्याजवळ 40 एकराची काजूबाग जळून खाक, आगीत हजारांहून अधिक काजू कलमांचं नुकसान https://goo.gl/YLvBkz

13.    श्रीलंकेतल्या तिरंगी मालिकेसाठी विराट आणि धोनीसह प्रमुख गोलंदाजांना विश्रांती, दक्षिण आफ्रिका दौऱ्याचा ताण हलका करण्यासाठी बीसीसीआयचा निर्णय https://goo.gl/9JKorF

14.    टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला मानाची गदा, आयसीसीच्या वतीने सुनील गावस्कर आणि गॅमी पोलॉक यांच्या हस्ते गौरव, 10 लाखांचे अमेरिकन डॉलर्सही सुपूर्द https://goo.gl/CMDLsn

15.    ग्रेग चॅपेलना प्रशिक्षक नेमण्यासाठीचा आग्रह करिअरची सर्वात मोठी चूक, टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची कबुली https://goo.gl/KhcEUo

BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर समीर गायकवाड यांचा विशेष ब्लॉग – ‘नीले नीले अंबर पर चांद जब आ जाये..’. https://goo.gl/5qGncJ    

BLOG : सिनेसमीक्षक अमोल उदगीरकर यांचा ब्लॉग (पुन: प्रकाशित) - श्रीदेवी नावाचं फेनॉमेन https://goo.gl/V8PLD4  

विशेष कार्यक्रम :

रात्री 8.30 वा. : ‘कॉमेडी क्वीन’

रात्री 9.30 वा. : स्मॉल स्क्रीनवरची ‘हवाहवाई’

एबीपी माझाचे सर्व व्हिडीओ - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा