1.    गणेशोत्सवात डीजे-डॉल्बीला परवानगी नाहीच, मात्र लाऊडस्पीकरच्या वापरावर सरकारने उत्तर द्यावं, मुंबई हायकोर्टाची सूचना https://goo.gl/f6XwE8

2.    कोणत्याही परिस्थितीत डॉल्बी लावणारच, साताऱ्याचे खासदार उदयनराजे आक्रमक, कोर्टाचा अवमान झाल्यास कारवाईस तयार असल्याचे विधान, तर डॉल्बी वाजवू न देण्यावर पोलिसही ठाम https://goo.gl/m5PUvb


3.    राष्ट्रवादीचे बीडचे आमदार जयदत्त क्षीरसागर बाप्पाच्या दर्शनासाठी ‘वर्षा’वर, तर मुख्यमंत्र्यांनी घेतलं काँग्रेस नेते कृपाशंकर सिंह यांच्या बाप्पाचं दर्शन, राजकीय चर्चांना उधाण https://goo.gl/J1TkHQ

4.    महाराष्ट्रात काँग्रेसची युवा ब्रिगेड सज्ज, सत्यजीत तांबे यांची राज्य युवक काँग्रेस अध्यक्षपदी निवड, तर आमदार अमित झनक उपाध्यक्षपदी https://goo.gl/vddfS8

5.    इंधन दरवाढीची मालिका सुरुच, परभणी, नांदेडमध्ये पेट्रोल नव्वदीपार, अर्थव्यवस्थेच्या सद्यस्थितीवर शनिवारी पंतप्रधानांनी बैठक बोलावली https://goo.gl/KE7SRh

6.    हुंड्यासाठी छळाच्या प्रकरणात अटकेचा निर्णय तपास अधिकारीच घेणार, तक्रारी कुटुंब कल्याण समितीकडे पाठवण्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाकडून रद्द https://goo.gl/eJ1w35

7.    पाच लाखांसाठी सासरच्यांकडून विवाहितेची हत्या, संशय येऊ नये म्हणून मृतदेह लटकवल्याचा आरोप, हिंगोलीच्या वसमतमधील घटना, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल https://goo.gl/XYoMMo

8.    औरंगाबादच्या उपमहापौर विजय औताडेंविरोधात मनपा अधिकाऱ्याची पोलिसात तक्रार, शिवीगाळ, धमकीसह मारण्याचा प्रयत्न केल्याचाही आरोप https://t.co/1Gi1SW3QCw

9.    नवी दिल्लीत पोलिस उपनिरीक्षकाच्या मुलाकडून तरुणीला जबर मारहाण, प्रेयसीनं लग्नाला नकार दिल्यानं व्हीडिओद्वारे तरुणीला धमकी, आरोपी रोहित तोमरला बेड्या https://goo.gl/M7tw5R

10.    भीम आर्मीचा संस्थापक चंद्रशेखरची 16 महिन्यांनंतर जेलमधून सुटका, उत्तर प्रदेशातील सहारनपूरमधील दंगल भडकावण्याचा चंद्रशेखरवर आरोप https://goo.gl/nbEVhv

BLOG : प्रसिद्ध ब्लॉगर अनिल गोविलकर यांचा ब्लॉग - परंपरेतील सर्जनशीलता अर्थात नवता!! https://t.co/wE45EjPcew

BLOG : एबीपी माझाचे प्रतिनिधी अश्विन बापट यांचा ब्लॉग - उत्सवांचा राजा गणेशोत्सव https://goo.gl/yoS8NX

एबीपी माझाच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा - https://www.youtube.com/abpmajhalive

एबीपी माझाला इन्स्टाग्रामवर फॉलो करा - https://www.instagram.com/abpmajhatv

एबीपी माझा तुमच्या स्मार्टफोनवर पाहण्यासाठी फक्त एक मिस्ड् कॉल द्या 9223 016 016

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा