एबीपी माझाचं व्हॉट्सअॅप बुलेटीन 04/12/2017


1.    बॉलिवूडचा हँडसम हिरो काळाच्या पडद्याआड, ज्येष्ठ अभिनेते शशी कपूर यांचं प्रदीर्घ आजाराने निधन https://goo.gl/a5t3Ws

2.    काँग्रेस अध्यक्षपदी राहुल गांधींची निवड जवळपास निश्चित, इतर कुणाचाही अर्ज नाही, राहुल गांधींच्या समर्थनार्थ 890 प्रस्ताव, उद्या औपचारिक घोषणा https://goo.gl/HpzJMQ

3.    औरंगजेब राजवटीसाठी काँग्रेसला शुभेच्छा, काँग्रेसच्या घराणेशाहीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा घणाघात https://goo.gl/gA2AuZ

4.    मुंबई काँग्रेस कार्यालयाच्या तोडफोड प्रकरणी संदीप देशपांडेंसह मनसेच्या 8 कार्यकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी https://goo.gl/1kbWzz

5.    कोकण किनारपट्टीला ओखी वादळाचा फटका, रायगड जिल्ह्यात 4 ते 5 बोटी बुडाल्या, मुंबईतही सतर्कतेचा इशारा https://goo.gl/6ppRLX

6.    1993 सालचं मुंबई बॉम्बस्फोट प्रकरण, मोहम्मद ताहीर मर्चंटच्या फाशीला स्थगिती, टाडा कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती, मार्च महिन्यात पुढील सुनावणी http://abpmajha.abplive.in/

7.    मुंबईकरांना दिलासा, मेट्रोच्या भाडेवाढीला हायकोर्टाचा नकार, समितीची नियुक्ती करुन तीन महिन्यात अहवाल सादर करण्याचे आदेश https://goo.gl/y6f6nZ

8.    मुंबईतील मस्जिद बंदर स्टेशनजवळ रेल्वे रुळावर तब्बल तीन लोखंडी रॉड, मोटरमनच्या सतर्कतेने मोठी दुर्घटना टळली https://goo.gl/dU5KGe

9.    15 दिवसात 50 कोटी रुपये जमा करा, प्रसिद्ध बिल्डर डी. एस. कुलकर्णींना कोर्टाचा आदेश, 19 डिसेंबरपर्यंत अटकेपासून दिलासा https://goo.gl/Y9dprC

10.    नितीन आगे हत्या प्रकरणाची 2016 च्या सुधारित अॅट्रोसिटी कायद्यांतर्गत सुनावणी व्हावी, माजी खासदार भालचंद्र मुणगेकरांची मागणी, 1 जानेवारीपासून राज्यव्यापी आंदोलनाचाही इशारा https://goo.gl/uPJSaB

11.    औरंगाबादेत काँग्रेस नगरसेवकाचा ओंगळवाणं प्रदर्शन, वाढदिवसानिमित्त भर रस्त्यात धांगडधिंगा, ‘मैं हूँ डॉन’ गाण्यावर डान्स आणि पैशांची उधळपट्टी  https://goo.gl/TKy97X

12.    एकदा मृत्यूचा चकवा, मात्र काळाने पुन्हा गाठलं, अपघातग्रस्त मुलाला नेणाऱ्या रुग्णवाहिकेला अपघात, चिमुरड्यासह आईचाही मृत्यू https://goo.gl/w1UMyS

13.    सुरतमध्ये रॅली काढू नये म्हणून 5 कोटी रुपयांची ऑफर, पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलचा दावा https://goo.gl/zgShUi

14.    अधिकाऱ्यांना संपत्तीचा तपशील देण्याची गरज नाही, कायद्यातील दुरुस्तीमुळे मोदींनी लोकपाल कायदा कमकुवत केला, अण्णा हजारेंचा आरोप https://goo.gl/Wp9Spm

15.    मॅथ्यूजपाठोपाठ श्रीलंकेचा कर्णधार दिनेश चंडिमलचंही शतक साजरं, भारताविरोधातील दिल्ली कसोटीत श्रीलंकेला फॉलोऑनची नामुष्की टाळण्यात यश https://goo.gl/xckG67

माझा विशेष : काँग्रेस पक्षात औरंगजेबी राजवट? पाहा विशेष चर्चा रात्री 9.15 वाजता फक्त एबीपी माझावर...

बातम्या, स्पेशल रिपोर्ट, मुलाखती, माझा कट्टासह सर्व व्हिडीओ पाहा यूट्यूबवर - https://www.youtube.com/abpmajhalive

@abpmajhatv पाहा आपल्या मोबाईलवरही. ABP LIVE अॅप डाऊनलोड करा, हवा तिथे एबीपी माझा पाहा. कनेक्ट राहा, अपडेट राहा

प्रत्येक अपडेट www.abpmajha.in वर