राज्यासह देश-विदेशातील बातम्यांचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये 1. मुंबईसह कोकणात मुसळधार पाऊस, मराठवाडा-विदर्भ आणि खान्देशात हलक्या पावसाचा अंदाज, कोल्हापुरातही पंचगंगेच्या पाणीपातळीत वाढ 2. पहिल्याच पावसाने केली सरकारची पोलखोल, ठाण्यात अर्ध्या फुटानं रस्ता खचला, गोवा हायवेचीही चाळण तर विजापूर गुहागर मार्गावर चिखलाचं साम्राज्य 3.मराठा आरक्षण 16 टक्केच ठेवण्यासाठी प्रयत्न करणार, मराठा कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरेंचं आश्वासन, तर महाराष्ट्र क्रांती सेनेकडून मुख्यमंत्र्यांना मराठा गौरव पुरस्कार जाहीर 4. विधानसभा निवडणुकीसाठी वंचित आघाडीला सोबत घेण्यासाठी काँग्रेसचे प्रयत्न सुरु, 3 जुलैला चर्चेची पहिली फेरी, दिल्लीत राहुल गांधींसोबत झालेल्या बैठकीत निर्णय 5. पुण्यातील संरक्षण भिंत दुर्घटनेप्रकरणी आल्कन स्टायलसच्या 2 भागीदारांना बेड्या, कोंढव्यात भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 2 चिमुकल्यांसह 13 मजुरांचा मृत्यू
Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 30 मे 2019 | शनिवार
एबीपी माझा वेब टीम | 30 Jun 2019 09:48 AM (IST)