Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 14 फेब्रुवारी 2020 | शुक्रवार | ABP Majha
एबीपी माझा वेब टीम | 14 Feb 2020 09:35 AM (IST)
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये
देश विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा स्मार्ट बुलेटिनमध्ये 1. भाजप नेत्यांची गोली मारो वक्तव्य महागात पडली, दिल्ली पराभवावर गृहमंत्री अमित शाह यांची कबुली तर सीएएवर आंदोलकांशी चर्चेची तयारी 2. औरंगाबाद महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंचा दौरा, संभाजीनगरचेही बॅनर झळकले, बॅनरवर राज यांचा हिंदूत्व नायक असा उल्लेख 3. ग्लोबल वॉर्मिंगसाठी बीफ इंडस्ट्री जबाबदार, काँग्रेस नेते जयराम रमेश यांचं वक्तव्य, शाकाहार उत्तर असल्याचाही दावा 4. डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे हत्येप्रकरणी खटल्यास कधीपासून सुरुवात होणार, उच्च न्यायालयाचा संतप्त सवाल 5. मुंबईतील डबेवाल्यांना हक्काचं घर मिळणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंत्रालयातील बैठकीत आश्वासन 6. मुंबई महापालिका शाळांमध्ये पाणी पिण्यासाठी विशेष घंटा वाजवण्याआधी स्वच्छ पाणी पुरवा, उच्च न्यायालयाच्या सूचना 7. सायन उड्डाणपुलावर बेअरिंग बदलण्याचं काम, आजपासून 17 फेब्रुवारीपर्यंत पूल बंद, वाहतूक कोंडी होण्याची शक्यता 8. गुजरात पाटीदार आरक्षण आंदोलनाचे नेते हार्दिक पटेल 20 दिवसांपासून बेपत्ता, पत्नी किंजल पटेल यांचा दावा, गुजरात सरकार टार्गेट करत असल्याचाही आरोप 9. चीन सरकारने 50 हजार कोरोनाग्रस्तांना जाळल्याची माहिती सोशल मीडियावर व्हायरल तर जपानच्या जहाजावरील भारतीयांना वाचवण्यासाठी पंतप्रधान मोदींना साकडं 10. इन्फोसिसचे सहसंस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई ऋषी सुनक ब्रिटनचे नवे अर्थमंत्री, अर्थमंत्री साजिद जेवीद यांनी राजीनामा दिल्यानंतर सुनाक यांची नियुक्ती