मुंबई : गोळीबारात मृत्यू झालेले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांचं पार्थिव त्यांच्या बोरिवलीतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. दुपारी दोनच्या सुमारास त्यांचं पार्थिव घरी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं. यावेळी अभिषेक घोसाळकर यांची पत्नी आणि मुलीने एकच हंबरडा फोडला. यावेळी अभिषेक घोसाळकर यांचे वडील आणि माजी आमदार विनोद घोसाळकर (Vinod Ghosalkar) हे सुद्धा धाय मोकलून रडताना दिसले. अभिषेक घोसाळकर  यांच्यावर थोड्याच वेळात बोरिवलीतच अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 
 
 मुंबईतील दहिसर (Mumbai Dahisar Firing)  इथले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र (Shiv Sena UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मॉरिस नोरोन्हा नावाच्या (Morris Noronha) स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी 8 फेब्रुवारी रात्री 8 च्या सुमारास हा गोळीबार केला.  यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. 


उद्धव ठाकरे यांची उपस्थिती


दरम्यान, ठाकरेंचे कट्टर समर्थक असलेल्या विनोद घोसाळकर यांच्या मुलाचा आणि शिवसेना ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाची अशी धक्कादायक हत्या झाल्यानंतर, उद्धव ठाकरे हे सहकुटुंब घोसाळकरांच्या घरी पोहोचले. उद्धव ठाकरे यांच्यासोबत पत्नी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे हे सुद्धा उपस्थित होते. 


उद्धव ठाकरे आणि ठाकरे गटाचे नेते  हे घोसाळकरांच्या निवासस्थानच्या समोर असलेल्या एका हॉलमध्ये थांबले. उद्धव ठाकरेंनी पोलीस उपायुक्त आणि पोलीस अधिकाऱ्यांची  चर्चा करुन, संपूर्ण प्रकरणाची माहिती घेतली. 


बंदुकीबाबत मोठा खुलासा


दरम्यान मॉरिस नोरोन्हाने त्याचा अंगरक्षक अमरीश मिश्राच्या बंदुकीनं घोसाळकरांवर गोळीबार केला होता. अमरीश मिश्राकडे जे पिस्तुल होतं, त्याचा परवाना उत्तर प्रदेशातील फुलपूर पोलिसांनी दिल्याची माहिती समोर आली आहे.  अंगरक्षकाच्या बंदुकीनं मॉरिसनं घोसाळकरांवर गोळ्या झाडल्या.  मॉरिसने पाच गोळ्या झाडल्या, त्यापैकी तीन गोळ्या अभिषेक घोसाळकर यांना लागल्या. त्यानंतर मॉरिसने स्वत:च्या डोक्यात गोळी झाडून आयुष्याचा शेवट केला. 


अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान हत्या


अभिषेक घोसाळकर यांची फेसबुक लाईव्हदरम्यान हत्या झाली.  मुंबईतील दहिसर (Mumbai Dahisar Firing)  इथले उद्धव ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि माजी आमदार विनोद घोसाळकर यांचे सुपुत्र (Shiv Sena UBT) अभिषेक घोसाळकर (Abhishek Ghosalkar) यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली.  मॉरिस नोरोन्हा नावाच्या (Morris Noronha) स्वयंघोषित नेत्याने गुरुवारी 8 फेब्रुवारी रात्री 8 च्या सुमारास हा गोळीबार केला. यानंतर नोरोन्हाने स्वतःवर गोळीबार करुन आत्महत्या केली. फेसबुक लाईव्हदरम्यान हा सगळा थरार रंगला.मॉरिस नोरोन्हा याच्यावर याआधीही गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. हत्या, अत्याचार आणि फसवणूक यासारखे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. बलात्कार प्रकरणात गोवल्याचा राग मॉरिसला होता. त्यातूनच अभिषेक घोसाळकर यांची हत्या झाल्याचा आरोप आहे.  


VIDEO : अभिषेक घोसाळकरांची पत्नी, मुलगी ढसाढसा रडल्या



 


संबंधित बातम्या 


कट्टर शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंकडून अखेरचा निरोप, ठाकरे कुटुंबीयांनी घेतली घोसाळकरांची भेट   


अभिषेक घोसाळकरांवर गोळ्या झाडणाऱ्या मॉरिसचा मृतदेह चर्चमध्ये दफन करु देणार नाही; स्थानिकांचा आक्रमक पवित्रा