मुंबई : मराठा मोर्चांसंदर्भात मुख्यमंत्र्यांनी चर्चेची दारं उघडी ठेवली आहेत. त्यामुळे शरद पवारांना प्रत्येक वेळेस राजकीय लुडबूड करण्याची आवश्यकता नाही, असा घणाघात भाजपचे मुंबई अध्यक्ष आमदार आशिष शेलार यांनी शरद पवारांवर केला आहे.
"मुख्यमंत्र्यांनी प्रस्थापितांच्या विरोधातला मोर्चा म्हटल्यावर ती टोपी शरद पवारांच्याच डोक्यावर फिट का बसली?", असा सवालही आशिष शेलार यांनी केला आहे.
"सरकार योग्य काम करते असून, योग्य वेळी निर्णयही होत आहेत आणि समाज सरकारला काहीतरी सांगू पाहतो आहे. त्याचा संवाद आता मुख्यमंत्र्यांनी सुरु केला आहे. त्याबाबत मुख्यमंत्र्यांचे विशेष अभिनंदन करतो", असेही यावेळी शेलार म्हणाले.